◾थोडं मनातलं :- गावाकडचं पत्र...

📮 गावाकडचं पत्र  !!  📬

तुझ्या डोळ्यात का पाणी आलंय? अवो, काई न्हाई, चुलीच्या धुरानं पाणी आलंय जरा, न तुमच्या डोळ्यात का पाणी आलंय ? आगं, वावधान उठलं न फुफाटा डोळ्यात गेलायं बघ. दोघांनी एकमेकाला खोटंच सांगितलेलं. तालुक्याला शिकणाऱ्या पोराचं पत्र आलेलं. खुशाली कळवली, अभ्यास नीट करतोय म्हणून सांगितलं... त्याचा दोघांना आनंद झालेला.

पत्र आलेलं डालडाच्या पत्र्याच्या डब्यात, भाकरीच्या रिकाम्या फडक्याखाली ठेवलेलं. त्याला भाकरीचा, लोणच्याचा गंध लागलेला. सकाळी आईन पाठवलेल्या भाकरीच्या खाली डब्याच्या तळाला वडलान लिहिलेलं पत्र वाचून पोराच्या डोळ्यातून पाणी आलेलं. "पाऊस बराय, गहू काढणीला आलायं, गाईला कालवड झालीय, तिचा खरवस पाठवलाय तुझ्या आईनं, तुझ्या मित्रांना पण दे, बाकी खुशाल, सुट्टीत आल्यावर बोलू, काळजी घे."

घरच्या जुन्या वहीच्या चतकोर पानावर सातवी पास वडीलानं लिहिलेलं पत्र. पेनाची कांडी संपली म्हणून शेवटच्या ओळी पेन्सिलनं लिहिलेल्या. पण त्या अक्षरांना गंध असायचा, मायेचा ओलावा असायचा.भाकरीचा, भाजीचा, चटणीचा आणि आईवडिलांच्या मायेचा गंध.

हजारो पत्र्याचे डबे रोज एसटीने अशी आईबापाची खुशाली पोरांना न पोरांची खुशाली आईबापाला कळवत असायचे. लांबच्या गावात शिक्षणाला असलेल्या पोराला, परगावी असलेल्या पाव्हण्या रावळे, नातेवाईकाला खुशालीचं पोस्टकार्ड जायचं. कधीतरी कुणीतरी गेल्याची न दशक्रियेची माहिती देणारी काळ्या शाईत छापलेली पांढरी कार्ड असायची.

परगावी दिलेल्या लेकीला बाप अंतर्देशीय पत्र टाकायचा. नीळं पत्र आलं न घरातल्या कुणीतरी आणून दिलं कि कामातून वेळ काढून सासुरवाशीन लेक अधिरतेने अल्लाद पत्र फोडून वाचायची. “अनेक उत्तम आशीर्वाद" अस वाचलं कि बापाचा खरखरीत हात गालावरून फिरल्याचा भास व्हायचा. पत्र वाचताना लेकरू मांडीवर बसलेलं असायचं न "पिंट्याला गोड पापा" वाचलं कि नकळत हात लेकराच्या डोक्यावरून फिरायचा. शेवटाला "सगळे खुशाल आहेत" वाचलं कि डोळ्यातून पडलेल्या थेंबानी शाई ओली होऊन अक्षर विस्कटून जायची.

रात्री एकांतात पारायण करताना फुटलेला हुंदका नवऱ्याच्या हसण्यात विरघळून जायचा. अक्षरावरून हात फिरवताना आईवडिलांच्या मायेचा जणू स्पर्श जाणवायचा. पोस्टाच्या पिवळ्या पाकिटातून राख्या यायच्या, नाहीतर तिळगुळ यायचे, बारीक प्लास्टिकच्या पुडीत ठेवलेले.
भावाच्या आठवणी, लटकी भांडण सगळ लख्ख आठवायचं.

लग्न जमलेली, जमवण्याच्या प्रयत्नात असलेले, कॉलेजला असलेली जोडपी निगुतीन गुलाबी सुगंधी कागदावर चांगलं अक्षर असलेल्या मित्र, नाहीतरी मैत्रिणीकडून लिहून घेऊन तेही रंगीत पेनानं *"मोहब्बतका इजहार"* करायची. अशी पत्रं एखादी वही पुस्तक देण्याच्या निमित्ताने दिली जायची. मग अशी सुगंधी पत्र कुठल्यातरी वहीच्या मधल्या पानात लपून बसायची न त्याचीही पारायण व्हायची. लग्न ठरलेल्या जोड्यांची पत्रं घरात आली कि कुणी फोडत नसलं तरी त्यावरून लहान भाऊ, बहिण, वहिनी चेष्टा मात्र करायची, अन अशी चेष्टाही गोड गुदगुल्या करायची.

कधीतरी अवेळी दरवाजावर पडलेली थाप आणि *"तार"* अशी हाक ऐकली कि काळजात धस्स व्हायचं न छातीचा ठोका चुकायचं. आलेली तार बहुतेक वेळा कुणाच्या तरी गेल्याची वर्दी द्यायची तर क्वचित प्रसंगी नोकरीवर रुजू व्हा म्हणून निवड झाल्याची बातमी देऊन आनंदी करायची.

साध्या चतकोर पानावर लिहिलेली चिठ्ठी, पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्रं असोत कि गुलाबी कागदावर लिहिलेली पत्रं असोत, त्या अक्षरांचा सुगंध आणि स्पर्श अगदी नेमका जाणवायचा, अगदी मनाच्या तळाला जाऊन पोहोचायचा.

काळ बदलला. स्मार्टफोन आणि सोशल मिडीयाच्या जमान्यात असली पत्रं पाठवणं म्हणजे बैलगाडीचा स्पीड वाटेल एखाद्याला. पण वाट पाहण्यातली आतुरता, हुरहूर आणि आता तेवढं राहीलं नाही. तस तर पहिलं काहीच आता पहिल्यासारख राहीलं नाही.

✧═══❁❁═══✧✧═══❁❁═══✧
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

निसर्ग किमया कि देवता ... Mother Nature

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...