◾कविता :- एक फोन कर...
एक फोन कर...
खरचं यार बोललं की बरं वाटतं,
*खरचं आपलं कोणी आहे हे खरं वाटतं,*
*तुझं - माझं त्याचं याची होते चौकशी*
*समजते सारी मंडळी आहेत कशी*
*फार नसतात हो लोकांच्या अपेक्षा,*
*आपले कोणी आहे*
*त्यांनी बोलावं मन भरून*
*इतकीच असते इच्छा*
*काहीही करतो फाॕरवर्ड आपण*
*नसतो कधी काही संबंध*
*त्यापेक्षा थेट फोन करून बोलावं ना,*
*अधिक जुळून येतील बंध*
*कुठे माहिती आहे आपल्याला,*
*कोणी असेल एकटं*
*भरून आलं असेल मन त्याचं*
*बोलावं त्याला वाटतं*
*नुसतेच लाईक कमेंंट*
*या पलिकडे जोडलीत आपण नाती*
*मैत्र जपलं पाहिजे*
*त्यासाठी उजळल्या पाहिजेत ज्योती*
*गेली कुणाची आई,*
*भाऊ गेला कुणाचा,*
*यार सखा, गेला मित्र,*
*कुणाचे गेले असेल छत्र,*
*आपणही केवळ आहोत जिवंत*
*त्यांच्या शिवाय नाही जगणे*
*चल यार एक फोन करुया*
*नाही बरे असे तुटक वागणे*
*संकटे येतील संकटे जातील*
*धीर द्यायला हवा,*
*एकटेपणा काय असतो*
*कधी अनुभवून पहा*
*आपण लाकडी, लोखंडी*
*नाही आपण पुतळे,*
*आणि नाहीच आपण काळीज नसणारे केवळ मानवी सापळे*
*एक मोबाईल दोन दोन कार्डे*
*चोवीस तास चालू नेट*
*फक्त ठरवा मनाशी आपल्या*
*आपल्या माणसाची होईल भेट*
*कोण कुणाला देऊन घेऊन*
*कायम काही पुरत नाही,*
*माणसं निघून गेल्यावर*
*मागे काही उरत नाही*
*जाऊ दे ना, कधी काळी*
*बोलला असेल काही,*
*दिला नसेल कधी जामीन*
*दिली नसेल सही...*
*आता ती वेळ नाही*
*आणि नको तो राग*
*माणूस आहे आपण*
*माणसा सारखे वाग*
*त्याला असेल-नसेल गरज पैशाची,*
*कदाचित आपण करुही*
*शकणार नाही मदत*
*पत प्रतिष्ठा मोठेपणा*
*सोडू थोडा अंहकार*
*नको काढत बसू*
*मागचं सोडून दे ना यार!*
*जर वाटत असेल खरोखरच*
*तर जरूर मनाशी एक धर,*
*आपलीच आहेत माणसं सारी*
*निदान एक फोन कर,*
*निदान एक फोन कर....*
*मदत करण्याची नसेल माझी पात्रता*
*मदत मिळवून देण्याचा प्रयत्न असेल माझा*
(मी सध्या रोज चार दोन माणसांशी फोनवर बोलतो आहे. आपणही बोला; काळ कठीण आहे. आणि हे गरजेचे आह़े. कारण हा माणूसकीचा ऑक्सिजन आहे.)
____________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा