◾कविता :- वळीव मौसम | संतराम पाटील | Marathi poem
कविता
वळीव
सुसाट सुटला वारा ,पसरली धुळीची तुस
जमुन आले ढग ,जसे पिंजलेला कापूस ...
कडाडल्या विजा ,त्या तर अग्नीच्या रेषा
अंधारल्या असमंतात ,चमके दाही दिशा ...
मोडुन पडली वृक्ष सारे ,ताडआणि माड
रस्ता पडला झाडावर की ,रस्त्यावरती झाड ...
बरसात झाली पावसाची ,दरवळे गंध
नासिके मधे भरून उरला ,चंदणाचा सुगंध ....
पहिला पाऊस आवकाळी,बरसे बांधाआड
पडती गारा अंगावरती ,झडे अंब्याचे झाड ...
काळी मैना खायला फैना ,करवंदे हो काळी
डोंगर भर फिरतात की,पोरपोरी कवळी ...
फळे लागली जांभुळी, ओथंबली झाडे
घस लोबंती काळे निळे ,मिठी तीवर पडे ...
रानमेव्याचा सिझन आला ,सारेच अलबेल
उन्हाच्या झळा सोसता,होईते घालमेल ...
वसंत सजला मनीच रूजला ,मनीहर्षे बहर
धावुन येते वादळासह ,वळीवाची सरसर...
___________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा