◾कविता :- ये रे मेघराजा
ये रे मेघराजा
झाली अक्षय तृतीया, कष्टाची झाली चाहुल
नांगरट कुळवट करून,झाली मशागत फुल ...
तयार झाले वाफे ,बांध बंदिस्त झाले
रानोमाळ साधे घात ,सर्जा राज्य भले भले...
रोहिणीचा साधण्या पेरा ,बळीराजा धजावला
पिकवायला तो मोती ,बोलवीतो मेघराजाला ..
तिपणी कुरी पुजण्या, सांगे सुवासिनिला
राणी बळीची पुजुनी ,देती हाक पावसाला...
बरसात होऊदे रे ,दे साथ तु धन्याला . ..
पावशा पक्षाची रे , साथच माझ्या कुळीला
अंगणी नाचुनी मोर ,देई साथ सदा बळीला...
नाचून मोर जेंव्हा,फुलवितो तो पिसारा
अगमना पावसाची , देई इशारा बळीला..
वृक्ष वेली आणि पक्षी,बोलवती मेघमाला
घे घात साधुनीया ,पेरणीला उशीर झाला....
रोहिणीचा साधे पेरा ,पीके मोत्याचा तुरा
साधले पाऊस पाणी ,येई लक्ष्मी घराला....
ये रे ये रे मेघराजा , धाव तुच अखेरीला
एक हाती घेतो भाकर ,दुसरा हात पेरणीला...
रचना
संतराम पाटील
केनवडे ता.कागल जि .कोल्हापूर
मो.नं 9096769554
_________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा