◾कविता :- अंतरीच्या वेदना

✏संकलन, शनिवारीय 'काव्यस्तंभ' कविता स्पर्धा
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
   ‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित 'शनिवारीय काव्यस्तंभ' स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
  🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗

      ☄विषय : अंतरीच्या वेदना☄
    🍂शनिवार : २९ / मे /२०२१🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
अंतरीच्या वेदना

जीवन गाणे गात गात
पुढे पुढे मी चालणार
अंतरीच्या वेदना असह्य
हसत हसतच झेलणार...!!१!!

सुंदर सुंदर जग निर्मिले
खरंच विधात्याची कमाल
काटेरी जीवन जगताना
संयम धैर्य माझी ढाल...!!२!!

मायबापाची माया गेली
डोंगराएवढे दुःख झाले
काटेरी जीवनात आज
गुलाब बनायचे ठरवले...!!३!!

दुःख ठेवून काळजात
अश्रुला आज रोकायचे
संस्कार आईचे आठवून
कर्तव्य सारे बजवायचे...!!४!!

अंतरीच्या वेदना माझ्या
गती वाढवतील पायाची
भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ
शिकवण लाख मोलाची..!!५!!

✍️सौ-राजश्रीताई मिसाळ ढाकणे बीड 
 कवयित्री/लेखिका/हायकूकार
 ©सदस्या-मराठीचे शिलेदार समूह
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
अंतरीच्या वेदना

कुणी ना जाणिल्या
अंतरीच्या वेदना,
घातली कधी ना
फुंकर दुःखांना

एकली मी अशी
दीन अन् दुबळी,
समजेना माझेच
मी साधी भोळी

काय ते चुकले 
असे या जीवनी,
फुलला ना कधी
बकुळ अंगणी.

रुक्ष मी अनाथ
मज ना तो नाथ,
एकली अभागी
ना कुणाची साथ.

भाळ हे फुटके
अक्षरे ना गोंदिली,
कोरी पाटी ऐसी
तशी कोरीच राहिली.

दर्द हृदयातील
ठेवीला जपून,
आली ही कविता 
मग वेदना बनून.

शब्दांनीच मज
घेतले जाणून,
अंतरीच्या वेदना
घेतल्या पिवून.

दुःख ओतले मी
माझ्या कवितेत,
खेळते शब्दांशी
दुःखाच्या गर्तेत.

सौ सविता पाटील ठाकरे
सिलवासा दा.न.ह.
©मुख्य परीक्षक,प्रशासक मराठीचे शिलेदार समूह
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
अंतरीच्या वेदना

त्या अंतरीच्या वेदना
कुणास सांगू कसा मी 
भोवताली तर सारे 
संधिसाधू बघतो मी

अंत नाही वेदनांचा 
तळमळते एकटी
चीरहरणा टपले 
विकृत वृत्ती कपटी

उसवले ते कायदे 
निसवल्या त्या भावना 
कुणापुढे मांडू आता 
या अंतरीच्या वेदना

रोज रोज पाहतो मी 
ती चिंध्या झालेली वस्त्र 
सांभाळतो त्या अश्रूंना
वेदनाचे केले अस्त्र 

नकोच सहानुभूती 
नको ते कँडल मार्च 
मागतो तुम्हा मी आता 
 माझेच हक्क निस्वार्थ 

लढणार माझ्यासाठी 
वज्रमूठ तलवार 
छळता कुणी मजला 
करील तयाला ठार

डॉक्टर संजय भा.पाचभाई
नागपुर
©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
 अंतरीच्या वेदना

ओघळले अश्रु नयनी
असह्य झाल्या वेदना
सर्व होते जवळी माझ्या
भिंगले ना कुणाच्या मना

ओझे ओझे डोई वझे
  सांगू कुणा यातना
बाजार मांडला दुःखाचा
 आता हा सोसवेना

असह्य झाल्या आता
   अंतरीच्या वेदना
दगडाचे झाले मन माझे
   पाझर फुटता फुटेना


मनीषा ब्राह्मणकर
अर्जुनी/मोरगाव,गोंदिया
©मराठीचे शिलेदार समूह सदस्या
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
अंतरीच्या वेदना

समजू ना शकले कुणी
तिच्या अंतरीच्या वेदना
सदैव  दाबल्या  गेल्या
मनातल्या   भावना 

बालपणा पासूनच
तिला दुर्लक्षीत केलं
स्त्री जातीत जन्मने
हेच पाप झालं

भूकेने झाले कासावीस
तरी ताटकळत बसायचं
उरले सुरले शिळे पाते
शेवटी पोटात टाकायचं 

धुनी भांडी तर तिला
नित्याची ठरलेली
मुलगी आहे याची
गळ्यात पाटी लागलेली

उंच उडण्याचे स्वप्न पंख
आधीच छाटून टाकले
अंतरीच्या वेदनेला खरचं
अजूनही ना कुणी जाणले

श्री.राजेश लक्ष्मीकांत धात्रक
ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर
©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
 अंतरीच्या वेदना

लपवून दुःख माझे मी आता निवांत आहे
खट्याळ हा किनारा का उगाच शांत आहे

सत्ता संपत्तीस तुमच्या सलाम हजारदा 
मृत्यूयात्रेस मात्र खांदेकऱ्यांची भ्रांत आहे

दे तोडून पाश आता उरले किती क्षण तुझे
विरक्त होवून जाणे हाच खरा सिद्धांत आहे

वादळाने कितीदा मोडले घरटे माझे तरी
माघार घेत नाही मी कष्टकरी जमात आहे

त्या अंतरीच्या वेदना काळासवे निवाल्या
सोसल्या आनंदाने तो माझाच प्रांत आहे

श्री.पद्माकर व्यंकटराव पांचाळ
मु.डहाणू जि.पालघर
(©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह)

➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
अंतरीच्या वेदना

कोरोना काळात,
दीन- रात,
बंदोबस्त करती...,
पोलीसांच्या,
अंतरीच्या वेदना,
कुणीच ना जाणती....!
कधी दीवसाची,
कधी रात्रीची,
कधी दिवस- रात्रीची सेवा....,
पोलिसांच्या,
भाळी,
नित्य कष्टांचाच ठेवा...!
ना जेवणाची वेळ,
ना झोपण्याची,
त्याला पाळता येते....,
कोरोना काळात,
वेळही त्याची,
फक्त परीक्षाच घेते....!
फक्त परीक्षाच घेते....!

श्री.मंगेश पैंजने सर,
ता.मानवत,जिल्हा-परभणी,
© सदस्य,मराठीचे शिलेदार समूह.
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
 अंतरीच्या वेदना

भावनांचा झाला बाजार
इथे मोल ना नात्याचे
खेळ मांडती शब्दांचा
कुणा ना इथे फुटे पाझर

साध्या भोळ्या मनास का
छळती इथल्या नजरा
कुणास ना कधी दिसले 
मनाचेच रचलेले सरण 

अग्नीत त्या होरपळताना
लाख यातना होती मनास
ना कोणी ऐकी त्याची हाक
जळूनी कोळसा होतसे

नको असे हे हळवे मन
तुडवती जन पायदळी
छळातून या मुक्ती व्हावी
ह्याच सदा अंतरीच्या वेदना

सौ.सुवर्णा महावीर ठोंबरे. इंदापूर, पुणे
©सदस्या मराठीचे शिलेदार
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
 अंतरीच्या वेदना

सप्तरंग उधळून रवी
सागरी न्हाऊन निघाला 
विखुरले किरण सारे
गुलाल नभी माखला

नभांगणीचा रंग तू
जीवनी या उधळला
सप्तरंगात नाहले मी
नकळत तू माझा जाहला

ओढ तुझ्या प्रेमाची
मन मंदिरी गंधाळली
आगमन होता तुझे
बकुळफुले ही लाजली

फुलविले माझे जीवन
स्वप्नात दंग मी जाहले
हृदयाच्या खोल गाभारी
स्वप्नचित्र तुझेच रेखाटले

स्वीकारले सख्या मी
सुख दुःखसह तुजला
कुरवाळशील ना सख्या
हळव्या भावनांस माझ्या

सल हृदयाची माझ्या
हृदयी तुझ्या जाणवू दे
अबोल अंतरीच्या भावना
न सांगताही तुज कळू दे

सौ.सविता क्षीरसागर वाई सातारा
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
अंतरीच्या वेदना

सांगु कशी तुला मी
सल आतल्या जीवाची 
प्रीतीस आपुल्या या 
लागो न दृष्ट कुणाची .

 बिलगे तरूस वेली 
विळखा कवेत झेली
 चाखीत स्वाद गोडी 
ती प्रीत गीत वेडी .

सौख्यात नांदताना 
का दुःख आठवावे
 अंतरीच्या वेदनाना 
 डोळ्यात साठवावे .

वेलीवरी परंतु
 फूल एक ना फुलावे 
मातृत्व सौख्य माझे 
अपुरेच का राहावे .

सौ विमल धर्माधिकारी
वाई सातारा
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
अंतरीच्या वेदना

होत नसेल ना तिच्यादेखील
अंतरीक मनाला वेदना 
देवीचा करणारे जागर
का करी स्त्रीची अवहेलना

आधुनिक काळात स्त्रीचे 
वाढले खूप महत्व
तरी मिटविले जाते
उमळणाऱ्या कळीचे अस्तिस्व

स्त्रीच स्त्रीच्या अंतरीक वेदना
घेत नाही समजून
नजरेची ईर्शा तिला
तोडत असते आतून

ती पण बघते स्वप्न
आपल्या पंखांना देते बळ
अटी घालून तिच्या मनात
निर्माण केली जाते खळबळ

कुशल डरंगे, अमरावती
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
अंतरीच्या वेदना

जाणिले नाही कुणीही, अंतरीच्या वेदनांना
रोखले डोळ्यात तेव्हा, वाहणाऱ्या आसवांना

दूर गेले सोयरे अन,दूर झाली सावलीही
अर्थ ना उरलाच आता, प्रेमवेड्या भावनांना

भोवताली सर्व होते , गोड पोळी चाखतांना
कोण आहे सोबतीला, भोग सारे भोगतांना

जीवनाचे सार आता ,सांगतो सर्वांस येथे 
राख थोडे भान तू ही, मानवा रे वागतांना

श्रीम स्वाती काळे ,श्रीगोंदा, अहमदनगर
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
अंतरीच्या वेदना

सोडून गेलीस
     दिवस कळेना
रोजच होतात
      अंतरी वेदना !!१!!

मायेची ममता
      पोरकी जाहली
पाखरं घरटी
       एकटी राहली !!२!!

जननी सर्वांची
       होतीस माऊली
कोणा हाक मारू
      रडती सोनूली !!३!!

घरात शोभून
      अंगणी तुळस
दिवा, तेल, वात
       मंदिरी कळस !!४!!

जनक जननी
      शोभा असे घरी
गेल्यावर होते
       हेळसांड खरी !!५!!

जन्म दिला आई
        मानू उपकार
धन्य झाली लेक
      जीवनी साकार !!६!!

जात नाही दिस
       वाट पाहे माई
येई परतुनी
       पिलांसाठी आई !!७!!

सौ. माधुरी शेवाळे पाटील
जिल्हा - नाशिक
©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
अंतरीच्या वेदना

अंतरीच्या वेदना 
सांगु तरी कसा मी 
शब्द मुके होतात 
कवीतेत मांडतांना 

अंतरीच्या वेदना 
गाऊ तरी कसा मी 
शब्दही सुर बदलतात 
साज चढवितांना 

अंतरीच्या वेदनांना 
फुंकर घालु कसा मी 
श्वासही पडतो कमी 
आग विझवितांना 

अंतरीच्या वेदनांना 
किती करु मी उजागर 
पाहीले  मी दुखाला 
प्राण सोडतांना 

अंतरीच्या वेदनांना 
साठऊ कुठे मी 
हृदयाच्या कुपीत पाहीले मी दुखाला 
मुके मुके रडतांना 

अंतरीच्या वेदनांचे 
स्पंदन मोजु कितीदा 
श्वासही थांबेल
 यदा कदा 

 सिध्दार्थ रामटेके सानगडी भंडारा
 ©सदस्य मराठीचे शिलेदार समुह
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
अंतरीच्या वेदना

कधी तुला रे समजतील
माझ्या अंतरीच्या वेदना
जीवापाड प्रेम करूनही
अर्थहीन केल्या भावना.

जीवनबाग सुकली माझी
आटला आनंदाचा झरा
अजूनही आहेस तू खरा
माझाच अनमोल हिरा.

सतत तुझ्या चुकांवर
मीच घालते पांघरूण 
कळेना कधी तू मला 
घेशील समजून उमजून. 

तुझ्या सुखातच माझे सुख
तुझ्या दुःखातचं माझे दुःख
स्वाभिमानाला ठेच लागली
तरीही तूच माझी तहानभूक.

जाणल्या नाहीस तू जरी
माझ्या अंतरीच्या वेदना
तेवेन हृदयी अखंड प्रीत
कळतील तुलाही भावना.

अविश्वासू तुझ्या वर्तनाने
पोळलयं माझं अंतःकरण
विश्वासघात केला भावनांचा
नीरस झालाय प्रत्येक क्षण.

✍️ सौ.सुजाता सोनवणे
सिलवासा दादरा नगर हवेली.
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

       🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन🌺
सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
         🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻
                  ✒राहुल पाटील
                      ७३८५३६३०८८
© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖


टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट