◾कविता :- तण खाई धन
पीक पाणी मुबलक नाही ,शांत नाही मन
पीक रहातं खुज आणि,मोठं येत तण !!
किती केली मशागत तरी,भरत नाही मन
गंधाळली माती तरी ,शिल्लक उरतं तण !!
पेरणी केली पिकांची, धुळ मातीचे कण
पीका आधी उगवुन येते ,न पेरलेले तण !!
हटवण्या या तणाला ,झिजले कितेक जन
सात पिढ्या सरल्या तरी ,हटले नाही तण !!
तणनाशके मारता मारता ,संपला ऑक्सिजन
मारणारे संपुन गेले ,संपले नाहीच तण !!
अन्नदाता सतत राबतो, स्वस्थ नसे मन
दिवसभर करतो शेती ,स्वप्नात दिसते तण !!
कळले आहे अन्नदात्याला ,तण देई धण
मन करून मोठं तो ,निंदुन काढतो तण !!
पीक सगळे जाईल ,पण जात नाही तण
खता शिवाय माजते ,त्याला म्हणतात तण !!
खत असते पिकाला ,ते रहाते खुजे
पीका पेक्षा मोठे रहाते, शिवारात तण !!
तणा तणा तण दे , फिरूदे खुरपे रानात
बळीराजा गुंतुन पडतो ,पिका पेक्षा तणात !!
रचना
संतराम पाटील
केनवडे ता.कागल जि. कोल्हापूर
मो नं 9096769554 ,9420339554
______________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा