◾कविता :- घेतला गं आई जन्म मी तुझ्या उदरी...
घेतला गं आई
जन्म मी तुझ्या उदरी,
म्हणूनच आयुष्यातली स्वप्नं सारी
करतोय आज साजरी,
केलच असेल गं आई
तु माझं बारसं अगदीच थाटामाटात,
जन्माचा माझ्या कौतुक सोहळाच
केला असेल तेव्हा साजरा तु गं आई रूबाबात,
चालायला बोलायला आई
तुच गं मला शिकवलं,
संस्काराचं तुझ्या
बालकडू मला पाजलं,
आई खरच आहेच गं तु
निसर्गाने माझ्यासाठी घडवलेली एक महान मुर्ती,
तुझ्यामुळेच पसरली आहे आज
चार-चौघात माझ्या यशाची किर्ती,
कसा गं विसरू मी आई
आयुष्यलं माझ्या अस्तित्व तुझं,
मोठा आज झालो तरीही
मायेला तुझ्या पारखं आयुष्य माझं.
➖➖➖➖⬛➖➖➖➖➖⬛➖➖➖➖
_________________________________
" स्वामी तिन्ही जगाचा, आई विनायक भिकारी "
मी तर एक तुच्छ मानव होऊनि तुझ्या उदरी जन्म घेतला आई
तुझे उपकार कदाचित या जन्मी तरी नाही फिटनार आई
जन्म का दिला, का मिळाला हे माहित नाही
पण
तो तुझ्यामुळेच मिळाला हे मी कधी विसरणार नाही
💐आई वाढदिवसाच्या निमित्ताने तुला कोटी कोटी नमन💐
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा