◾कविता :- आयुष्याच्या या वळणावर... | kavita | marathi poem...
आयुष्याच्या या वळणावर
ज्याच्या कृपे आलो इथवर
निवृत्तीच्या उंबरठ्यावर
आता स्मरावा वाटे ईश्वर
श्वासागणिक त्याला स्मरता
क्षणोक्षणी तो सोबत होता
नवलच आता ध्यानी उरता
वाटाड्या सुख दुःखात होता
मायाजाली उगाच भुलता
फोलपणा तो दावित होता
विट येऊनी मागे फिरता
कर्तव्य काय सांगत होता
कर्म धर्म कालगती साचा
सवेच माझी पराधिनता
अनुभवांच्या देतच खाचा
राखत होता हो अभिन्नता
आता म्हणे तू सोड पसारा
थकले शरीर घे विसावा
वंशवेलीचा फुले पिसारा
आनंदाने तो बघू देखावा
संगे होताच आहे राहील
प्रस्थानाची वेळही येईल
नियतीचा पाहिल ईशारा
तुजला माझ्या संगेच नेईल
निर्मिती:-
रा.र.वाघ,धुळे.
(मो.नं.७५०७४७०२६१)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा