◾बोधकथा :- स्वामी विवेकानंद आणि एका आज्जीचा अनुभव...
स्वामी विवेकानंद यांचे थोरपण दर्शविणारी अप्रतिम मराठी बोधकथा
स्वामी विवेकानंद आपल्या दिनचर्येत भारत परिक्रमा करत असे. स्वामी विवेकानंद भारत परिक्रमा करत असताना एका छोट्या खेड्यात आले . एका छोट्या झोपडीसमोर येउन त्यांनी पाणी मागितले . घरातून एक म्हातारी बाहेर आली .
तिने आधी त्यांची चौकशी केली , मग त्यांना घरात बोलावले . एक ग्लासभर दुधात चिमूटभर पूड मिसळून त्यांना दिले . नंतर पाणीही दिले . विवेकानंदांनी ते दूध , पाणी प्यायले . तेव्हा ती म्हातारी एकाएकी भावनातिरेकाने रडू लागली .
स्वामीजींनी तिला रडण्याचे कारण विचारले . ती म्हणाली , “ माझा मुलगा २ वर्षांपूर्वी वारला , त्याची रक्षा गंगेत समर्पण करण्याची माझी फार इच्छा होती . पण मला ते शक्य झाले नाही . तू गंगा परिक्रमा करून आला आहेस , तुझ्या शरीरात गंगेच्या पाण्याचा थोडा तरी अंश असेल . मी मुलाची चिमूटभर रक्षा दुधात मिसळून तुला दिली . निदान तिथे तरी ती रक्षा गंगेला मिळाली . मी तुला आधी सांगितले नाही , ही फसवणूक झाली.मी त्याबद्दल तुझी क्षमा मागते . पण आज माझ्या मुलाला मुक्ती मिळाली या आनंदामुळे हे अश्रू आले आहेत .
यावर स्वामी विवेकानंद ने आजी ला सांगितले की तुमचे योग्य आहे.तुमच्या पुत्राची रक्षा गंगेला मिळाली आहे असेच समजावे.कारण तुम्ही या वयात काशी वाराणसी ला जाऊ शकत नाही.हे त्यांचे बोल ऐकून अज्जी चे डोळे अजूनच पाणवले.स्वामी विवेकानंद ची पाठ थोपटत त्यांनी त्यास आशीर्वाद दिला.त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी आज्जीच्या निरोप घेऊन पुढील तिर्थटनास निघाले.
तात्पर्य : भारत धर्म प्रधान देश आहे . देश , भाषा , चालीरीती वेगळ्या असल्या तरी प्रत्येकाच्या मनात आपल्या तीर्थासंबंधी अतीव श्रध्दा असते.ती श्रद्धा एका विशिष्ट ठिकाणी आपण जाऊ शकत नसलो तरी मनात भाव असला तरी पूर्ण होते. हेच आमच्या सांस्कृतिक एकतेचे सूत्र आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा