ह्याला जीवन असे नांव ...

 ह्याला जीवन असे नांव 

मनाला भिडणारा एक किस्सा:-
" तिकीट कुठे आहे? " -- टी सी ने बर्थच्या खाली भीतीने लपून बसलेल्या त्या साधारण तेरा - चौदा वर्षाच्या मुलीला दरडावून विचारले. 
"न .. नाही आहे साहेब माझ्याकडे तिकीट" ती मुलगी बर्थच्या खालून बाहेर आली आणि कापऱ्या आवाजात टी सी ला हात जोडत म्हणाली. 
"चल, गाडीतून खाली उतर पटकन" टी सी ने म्हटलं. गाडी अजून व्ही. टी. स्टेशनच्याच फलाटावर उभी होती.
" तिचं तिकीट मी देत्ये" एक बायकी आवाज आला.
टी सी ने आवाजाच्या दिशेने पाहिले. एक स्त्री, तिचे नांव ऊषा भट्टाचार्य होते, आणि ती पेशाने प्राध्यापक होती. ती त्या मुलीजवळ आली आणि तिने तिला प्रेमाने विचारले 
"तुला कुठे जायचे आहे बेटा?" 
"मला नाही माहित बाईसाहेब मला कुठे जायचे आहे ते!" ती मुलगी म्हणाली. 
"हरकत नाही. मग तू माझ्याबरोबर बंगलोरला चल, तुझं नांव काय आहे? "
"चित्रा !" ती मुलगी म्हणाली.
बंगलोरला पोहोचल्यावर उषाजींनी चित्राला आपल्या ओळखीच्या एका चांगल्या स्वयंसेवी संस्थेकडे सोपविले आणि तेथील एका चांगल्या शाळेत तिला दाखला मिळवून दिला. कांहीच दिवसांत उषाजींची बदली दिल्लीला झाल्यानंतर त्या फोनवरच चित्राची चौकशी करीत असत. मध्यंतरी वीस वर्षे निघून गेली. दरम्यान उषाजींचा चित्राशी संपर्क बराच कमी झाला होता. एकदा उषाजींना एक लेक्चर देण्यासाठी सॅन फ्रांसिस्को (अमेरिका) येथे निमंत्रण मिळाले होते. त्यांचे व्याख्यान संपल्यावर त्या जेव्हा हॉटेलचे बिल चुकविण्यासाठी रिसेप्शन कौंटरपाशी गेल्या तेव्हा त्यांना रिसेप्शनिस्टने त्यांचे बिलाचे पैसे चुकते झाले असल्याचे सांगितले. तिने उषाजींच्याच पाठी उभे असलेल्या एका सुंदर जोडप्याकडे बोट दाखवून, त्यांनी बिलाचे पैसे भरल्याचे सांगितले.  
"तुम्ही माझे बिल का भरलेत? " उषाजींनी त्यातील स्त्रीला विचारले 
"मॅडम, ह्या बिलाचे पैसे, मुंबई-बंगलोरच्या रेल्वे भाड्यासमोर कांहीच नाही."  
उषाताईंनी तिच्याकडे निरखून बघितले आणि आश्चर्याने त्या ओरडल्या 
"अरे चित्रा ! ! ? ? ? . . . ."*
*( चित्रा म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून इंफोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा दस्तुरखुद्द श्रीमती सुधा मूर्ति आणि इंफोसिसचे संस्थापक श्री नारायण मूर्ति यांच्या सुविद्य पत्नी होत्या ।)*
ही घटना त्यांच्याच "द डे आई स्टाॅप्ड ड्रिंकिंग" या आत्मचरित्रात्मक पुस्तकात नमूद केलेली आहे.
बघा .... म्हणजे कधीतरी आपण कुणाला तरी सहज केलेली मदतही कुणाचे तरी जीवन किती बदलून टाकू शकते याचे हे जिवंत उदाहरण आहे. 

म्हणून नेहेमी प्रसन्न रहा, निरोगी रहा. आणि परमेश्वर आपल्याला गरजवंतांना मदत करण्याचे सामर्थ्य देवो ही सदिच्छा

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾थोडं मनातलं :- नवरा बायको मधील प्रेमल संवाद| Marathi Audiobook | audio story

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट