नोकरीदार प्राध्यापकाच्या लहान भावाचे मनोगत
दादाच्या नोकरीसाठी *संस्थाचालकाच्या* घशात चार एकर जमीन घालणारा त्याचा बाप आणि त्याचा लहान भाऊ दादाला कधी कळलाच नाही.
आपला दादा *प्राध्यापक* झालाय शहरात गेलाय आता आपल सगळ चांगल होईल. अशी आशा बाळगून गावात साखर पेढे वाटणारा लहान भाऊ दादाला कधी कळालाच नाही.
लहाणा शेती करतोय,तु नोकरी त्याच्या तिन मुला पैकी त्यातल्या एकाला तरी तुझ्यासोबत शहरात घेऊन जा त्यांना पण शिकव तुझ्यासारखच नोकरीला लाव म्हणून सांगणारा दादाचा *बाप* दादाला कधी कळलाच नाही.
दोन दोन,तिन तिन ..महिने *सासु सासऱ्याला* आपल्या घरी ठेवणाऱ्या दादाला कधी आपल्या जन्म दात्या आई वडिलांना चार आठ दिवस आपल्या घरी आणावं दादाला कधी उमगलच नाही. ....आईच थिगळं लावलेल लुगड बापाची मळकी कोपरी दादाला कधी दिसलीच नाही.
दादाला वर्षाच्या वर्षाला गहु,बाजरी,तुर,हरभरा दादाच्या गरजे पेक्षा कितीतरी जास्त धान्य स्वता टेम्पोत बसुन दादाच्या घरात स्वताःच्या खांद्यावर धान्याच्या पोत्यांची थप्पी लावणारा *लहान भाऊ* दादाला कधी कळालाच नाही.
आणि तेच धान्य शेजार्या पाजार्याना विकणार्या दादाच्या सौभाग्यवतीला शेतात राबणाऱ्या दिराचे कष्ट तिने कधी पाहीलेच नाही.
अरे दादा गेल्या दोन वर्षांपासून काहीच पिकलं नाही,दिवाळीला आपल्या तिन्ही बहीणी पण येतील त्यांना पण साडी चोळी घ्यावीच लागेल. मुलं पण कपड्यासाठी हट्ट करतील. मला दहा एक हजार रुपये दे रे दादा,कापुस निघला की देईल मी तुला तुझे पैसे.... गेल्या तिन महिन्यापासून पगारच झाला नाही म्हणून सांगणाऱ्या दादाला त्याच्या लहान भावाची व्यथा, तळमळ, लाचारी ही कधी कळलीच नाही.
सुट्यात गावाकडे सोन्याने मढवलेल्या आपल्या सौभाग्यवती सोबत आलेल्या दादाला आपल्या भावाची फाटकी ईजार, भावजयीची तुटकी चप्पल कधी दिसलीच नाही.
दादाला शहरात घर घ्यायला पैसे कमी पडतायत म्हणून लहाण्या भावानी त्याच्या एका शब्दावर गुर ढोर, विकुन फुलं ना फुलाची पाकळी केलेली मदत..... मुलीच्या लग्नात पंधरा लाखांची उधळपट्टी करणाऱ्या दादाला आपला भाऊ मातीच्या घरात लोळतोय हे त्याच्या कधी लक्षातच आलच नाही.
गावाकडच्या मिञमंडळीनां मुलांच्या शिक्षणावर मी किती पैसे खर्च करतोय म्हणून मोठ्यापणाने सांगणाऱ्या शहरी दादाला आपल्या लहाण्या भावाची मुलं परिस्थिती मुळे शिक्षणा पासुन वंचित आहेत हे कधीच दिसलंच नाही.
पण माञ निवृत्ती नंतर दादा नी रितसर आपली जमीन वाटुन घेतली..दादाला वाटलं नाही भावाला आपल्यातला एखांदा जमीनीचा गुंठा शिल्लक द्यावा उलट गेल्या पसतीस वर्षात तु जमिनीत काय पिकवल... कोरडवाहू जमीनीचा हिशोब मागतांनी दादाला जरा सुध्दा लाज वाटली नाही.
कधीकाळी केलेल्या तुटपुंज्या मदती माञ दादाने न विसरता तारीख, वार, साला सहीत टिपुन ठेवल्या होत्या.ते पैसै मागायला दादाला जराही शरम वाटली नाही. तरीही दादाला नोकरीला लावायला विकलेल्या चार एकर जमीनी बद्दल लहान भावाने चकार शब्दही काढला नाही.
खरतर लहान्या भावाचा त्याग दादाला कधी कळलाच नाही......🙏
"तुमच्या यशामध्ये कुणाचा हात असतो हे माहिती नाही...पण तुमच्या यशामागे तुमच्या घरच्यांचा त्याग,परीश्रम नक्कीच असतो"
_________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा