◾विशेष लेख :- वेळेचं महत्व... ✅


वेळेचं महत्व ज्याला कळतं, त्याचं काहीच अडत नाही. त्याची प्रगती ठरलेलीच असते. कारण तो सगळी कामे वेळच्या वेळी करत असतो. त्यामुळे त्याचे कुठे काही अडणे शक्यच नाही.

वेळेला महत्व देणाऱ्या लोकांना समाजात किंमत असते. कारण ते दिलेली वेळ पाळत असतात. आपली कामे जर समोरची व्यक्ती वेळेवर करत असेल, तर आपला तिच्यावरचा विश्वास अधिक दृढ होतो.

अनेक लोक सकाळी लवकर उठून आपली कामे करत असतात. सकाळी लवकर उठल्यामुळे व्यायाम, योगा यांनाही वेळ देता येतो. त्यामुळे तबेतही ठणठणीत राहते.
आपण एखादे काम हातात घेतले असेल, आणि ते वेळेत पूर्ण केले की आपण विश्वासास पात्र ठरतो. एका कामातून दुसरे काम आपल्याला मिळत जाते.

अनेकांनी स्वतःला चांगल्या सवयी लावून घेतलेल्या असतात. त्यातच वेळेवर सर्व कामे करण्याची सवय सुद्धा असते.

आपण क्षणाक्षणाला आपले आयुष्य कमी होत असताना पाहत असतो. आपल्याकडे उरलेला वेळ आपण सत्कारणी लावला पाहिजे, असे आपणास वाटणे स्वाभाविकच आहे. आणि तसा तो आपण लावण्याचा प्रयत्नही करत असतो.  प्रत्येक गोष्ट जर आपण वेळेत केली तर आपल्याला पस्तावण्याची वेळ कधीच येणार नाही.

जीवनात पुढे जायचे असेल तर वेळेला महत्व दिलेच पाहिजे. वेळ ही जशी आपली शत्रू असते तशीच ती आपली मित्र सुद्धा असते. वेळ आपल्याकडून चांगल्या वाईट गोष्टी करून घेत असते.

सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झाल्या म्हणजे पुढे काही अडचणी उद्भवत नाहीत. जर शेतात धान्य पेरायचे असेल तर, धान्य पेरण्या अगोदर, कोळपणी झाली पाहिजे, नांगरणी झाली पाहिजे. योग्य बिया उपलब्ध असल्या पाहिजेत. पाऊस येण्याअगोदर बिया शेतात टाकून झाल्या पाहिजेत. तरच त्या रुजतील. पण जर आपण वेळेला महत्व दिले नाही, आणि आजची गोष्ट उद्यावर ढकलली, तर कसे येणार धान्य शेतात? शिक्षण, लग्न वेळेतच झाले पाहिजे त्यात उशीर झाला तर पुढील सर्व गोष्टीना उशीर होतो.

जेंव्हा आपल्याकडे वेळ असते, तेंव्हा त्या वेळेचा सदुपयोगच आपल्याकडून व्हायला हवा. दिलेली वेळ पाळता आली पाहिजे. जर वेळ पाळता येत नसेल, तर एखादे काम शिरावर घेऊच नये.

'कडू डोस' या लेख संग्रहाला प्रस्तावना मिळावी म्हणून दिलीप मालवणकर आणि मी आम्ही दोघे   दैनिक लोकसत्ता व दैनिक तरुण भारतचे माजी संपादक मा. सुधीर जोगळेकर यांचेकडे 24 मार्च 2018 ला गेलो. त्यांना प्रस्तावना देण्याविषयी विंनती केली. त्यांनी विचारले, "कधीपर्यंत पाहिजे प्रस्तावना?"

"30 तारखेपर्यंत." मालवणकर "शक्यच नाही. 28 पर्यंत मला  बिलकुल वेळ नाही.  माझ्या मुली आणि जावई आले आहेत. 2 एप्रिल पर्यन्त देईन."

"ठीक आहे चालेल." मालवणकर आम्ही घरी आलो."

जर जोगळेकर यांनी प्रस्तावना दिली नाही, तर मग वेळेवर काय करायचे?" मी मालवणकर यांना प्रश्न केला.

"जोगळेकर खूप मोठा माणूस आहे, मोठी माणसं, जर काम होत नसेल तर स्पष्ट सांगून टाकतात. आणि काम होत असेल तरच शब्द देतात. दिलेला शब्द पाळतात. म्हणूनच तर ते मोठे झालेले असतात. जे लोक दिलेले शब्द पाळतात ते आयुष्यात मोठे होतात."मालवणकरांनी स्पष्टीकरण केले.

माझे समाधान झाले. मधल्या काळात फोन सुद्धा करू नका, असे मालवणकर यांनी सुचवले होते. म्हणून आम्ही दोघांनीही जोगळेकर यांना फोन केला नाही. 1  तारखेला मालवणकर यांनी मला आठवण करून दिली. "उद्या जोगळेकर यांना फोन करून विचारा प्रस्तावना लिहिली का?"

आणि 2 तारखेला मी झोपेत असताना सकाळी 8 वाजता जोगळेकर यांचाच फोन आला. "प्रस्तावना तयार आहे. मेल आईडी पाठवा, म्हणजे पाठवून देतो."

आम्ही अंदाज बांधला होता, ते कागदावर लिहून पाठवतील, पण त्यांनी चक्क टाईप करून पाठवले होते. अगदी आटोपशीर सर्व विषयांना हात घालणारी प्रस्तावना त्यांनी पाठवली. आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का दिला.

या गोष्टीवरून माझ्या लक्षात आले की, जोगळेकर उगीचच मोठे झाले नाहीत. त्यांनी दिलेली वेळ पाळली, आणि वेळेला महत्व दिले. त्यांनी प्रस्तावना द्यायला आणखी उशीर केला असता, तर आम्ही काय करू शकलो असतो? आम्हाला तर वाट बघावीच लागणार होती ना?

जगात वेळेला महत्व दिल्यामुळे मोठे झालेले अनेक उदाहरणे सांगता येतील.

माझा एक मित्र आहे. तो वेळेचा खूप पक्का आहे. त्याला सकाळी चार वाजता बोलवले तर तो चार वाजता बरोबर हजर होणार. त्यामुळे त्याच्यावर सोपवलेली सगळी कामे त्याने वेळेवरच पार पाडली आहेत. नेपोलियन बोनापार्ट याने जीवनात वेळेला खूप महत्व दिले, म्हणूनच तो अर्धे जग जिंकू शकला.

वेळेला महत्व न दिल्याने आपल्या वेळेप्रमाणे चालल्यामुळे अनेकवेळा गाड्या चुकवलेले लोक आपल्या आजूबाजूला वावरत असतात. सकाळी लवकर जाग येत नाही, म्हणून सकाळची नोकरी करू न शकणारे लोकही आजूबाजूला पाहिले तर सापडतील. आपल्या डोळ्यासमोरून लोकल गेल्यावर आपल्याला वेळेचं महत्व कळते.

परिक्षेत प्रत्येक प्रश्नाला योग्य वेळ न दिल्याने आणि वेळ भरभर निघून गेल्याने महत्वाचे उत्तरे येणारे  प्रश्न राहूनच जातात, आणि मग लक्षात येते, आपण एकदोन गुणांसाठी उगीचच इतकी टंगळमंगळ केली. ठरलेल्या वेळेत जर आपण कामावर गेलो नाही तर लेटमार्क ठरलेलाच असतो. लेटमार्क झाल्यामुळे किती यातना होतात.हे ज्याचा लेटमार्क झाला त्यांनाच माहीत असते.

कोणी भेटायची वेळ दिली असेल, आणि ती व्यक्ती जर वेळेवर आली नाही तर काय तगमग होते... ती वाट पाहणाऱ्यालाच विचारा. सर्कस मधील झोक्यावरील कसरती करणाऱ्यांना विचारा क्षणाचे महत्व. क्षणात समोरचा झोका आला नाही, तर काय गहजब होऊ शकतो.

जेष्ठ साहित्यिक प्राचार्य शिवाजीराव भोसले वेळेचे पक्के होते. त्यांचा वाचनासाठी राखून ठेवलेला वेळ ते कधीही कोणालाही देत नसत.

अनेक मोठी माणसं दिवसातून स्वतःसाठी काही वेळ राखून ठेवतात. ठराविक वेळेला जेवण करणारे आपले शरीर सुदृढ ठेवतात. सूर्य उगवण्याआधी ज्यांचा दिवस सुरू होतो, त्यांचा संपूर्ण दिवस चांगला जातो. वेळेशी नाते जमले की, वेळ आपली काळजी घेते. अगदी जवळच्या नातेवाईकाप्रमाणे.

कडू डोस.
वेळ आपल्यासाठी आहे. आपण वेळेसाठी नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. मिळालेल्या आयुष्याचा आणि वेळेचा सदुपयोग करायला शिकले पाहिजे.

मोठे व्हायचे असेल तर वेळ पाळायला शिकलेच  पाहिजे.

लेखक: अज्ञात.

➖➖➖➖◾➖➖➖➖◾➖➖➖➖

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

निसर्ग किमया कि देवता ... Mother Nature

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...