◾विशेष लेख :- लग्न झालेल्या मुलीच जीवन... | life of married Girl
एक स्त्रीला तिच्या पतीचं समर्थन असेल तर ती अख्ख्या जगासोबत लढू शकते.. पण जर तिच्या पतीचचं समर्थन तिला नसेल तर ती स्वतः सोबत पण हारून जाते..
"नवरा" आयुष्यभर "नवरा"च राहतो, "नवरी मुलगी" मात्र "बायको" बनते..
नवऱ्यासाठी, केवळ आणि केवळ 'फक्त नवऱ्यासाठीच' 'ती' एका अनोळख्या घरात जाते, बाकी सासरची नाती तर नंतर निर्माण होतात हो..
पत्नी ही 'पत्नी'ची भूमिका निभावण्या आधी कुणाच्या तरी घरातील लाडकी लेक असते, कुणाची तरी बहीण असते, कुणाची तरी हसत खेळणारी मैत्रिण असते..
नवऱ्यासमोर तर 'ती' इतर नात्याला पण महत्व द्यायला विसरते.. आणि मित्रमैत्रिणीनां वाटतं लग्नानंतर 'ती' बदलली..
लग्नानंतर सगळ्या परिस्थिती सोबत 'ती' जुळवण्याचा प्रयत्न करत असते. त्यातही पतीचा साथ असेल तर ठीकच, नाही तर 'ती' खचून जाते हो...
माहेरी लागलेल्या सगळ्या सवयी विरुद्ध सासरी वागावं लागत.. अचानक च मोठा व्हावं लागतं.. अचानक च जबाबदार व्हावं लागत.. आणि 'ती' हे सगळं बनण्याचं प्रयत्न ही खूप करते..
माहेरी 'ये आई, मला भूक लागली लवकर खायला दे' म्हणतच असतांना, आई ने सगळ्यात आधी आपल्याच हाथात ताट देणे..
पण सासरी गेल्या वर खूप भूक लागून हि सगळ्यांना वाढून झाल्या वरच, सगळ्यांचे जेवण झाल्यावरच, नंतर जेवण्याची सवय लागते..
माहेरी साधी सर्दी झाल्यावर घर डोक्यावर घेणारी 'ती'; सासरी मात्र तापाने फणफणत असली तरी कुणाला जाणू देत नाही..
कधी आईच्या राज्यात स्वयंपाक घरात न शिरलेली 'ती '; सासरी मात्र 'बायको' म्हणून नवऱ्यासाठी मन लावून स्वयंपाक करते..
कधी स्वतःच्या हातात भारी ओझं न उचललेली 'ती'; संसाराचं ओझं मात्र ओढायला शिकते..
कधीच स्वतःची बॅग नीट न पॅक केलेली 'ती'; सासरी मात्र स्वतः सोबत नवऱ्याचीही पॅकिंग मस्त करून दयायला शिकते..
माहेरी बहीण भावा मध्ये सगळ्यात आधी मला प्राथमिकता मिळायला हवी म्हणणारी 'ती'; सासरी मात्र सगळयात आधी नवऱ्याला प्राथमिकता देते..
माहेरी दुसऱ्याच्या हिश्शयामध्ये आलेलं असलं तरी हिसकावून स्वतः घेणारी 'ती'; सासरी मात्र स्वतःच्या हिश्शयाच आलेलंही पतीला न कळता दयायला शिकते..
स्वतः ची तयारी स्वतः नीट न करणारी 'ती'; सासरी मात्र नवऱ्याची, मुलांची ही तयारी करून दयायला शिकते..
कधी स्वतःचीच योग्य काळजी न घेतलेली 'ती'; सासरी मात्र नवऱ्याचीही, त्यांच्या घरातल्यांची काळजी घ्यायला शिकते..
कधी आई बापाची पण ऑर्डर न ऐकणारी 'ती'; सासरी मात्र सासऱ्यांची ऑर्डर ऐकते..
कधी आपल्या आई बापाला पण न घाबरणारी, आई बाबांन सोबत मैत्रीपूर्वक बोलणारी 'ती'; सासरी मात्र सासू सासऱ्यानां घाबरायला लागते..
स्वतःच्या आईला कसल्याही कामात मदत न करणारी 'ती'; सासरी मात्र सासूच ऑपेरेशन झाल्या वर त्यांची सेवा करायला लागते..
घरी भांडून हुज्जत घालणारी 'ती'; सासरी मात्र कुणाला वाईट वाटू नये म्हणून बोलणे सहन करते..
साध दुखलं माखल तरी सगळ्यांसमोर ढसा ढसा रडणारी 'ती'; सासरी मात्र दुःख झालं तरी आई बाबांची आठवण काढून एकांतात रडायला लागते..
आई बाबांना खाण्यापिण्या पासून सगळं डिटेल सांगणारी 'ती'; सासरी मात्र मोठे मोठे प्रॉब्लेम्सही असूनही, आई बाबांना वाईट वाटेल म्हणून सांगायला टाळते..
बाहेरून शॉपिंग करून आल्यावरही लगेच लोळत, 'ये आई चहा दे ग' म्हणणारी 'ती'; सासरी मात्र कितीही थकून आली तरीही लगेच कामाला लागते..
स्वतः कितीही शिकली तरी घरी तिची 'बायको', 'सून' वा 'आई' म्हणून असलेली भूमिका 'ती' निभावत असते..
जर एक 'मुलगी' लग्नानंतर इतकं बदलू शकते तर मग 'मुलाने' व घरातल्या इतर लोकांनी थोडं बदल तर काय होतंय..
एका मुलीला फक्त आदर आणि प्रेम हवं असतं हो, बाकी तर दुय्यम आहे..
"अरे 10 दिवसाचा गणपती उठवतांना हृदय पिळून निघतं, मग एवढे वर्ष सांभाळलेली मुलगी दुसऱ्यांच्या घरी देतांना त्या आई वडिलांना कस वाटतं असेल, त्या मुलीला कसं वाटतं असेल.. मुलगी सुखी राहावी, तिच्या नवऱ्यानी, सासरच्या मंडळींनी तिला सुखी ठेवावं; ही केवळ एकच अपेक्षा असते.."
ह्याची कल्पना करून पहा.. बघा 'तीला' आदर देणं जमतंय का?!..🙏🙏
••• सदर लेख आवडला तर नक्की शेअर करा •••
.
Great post sir
उत्तर द्याहटवा