'आली आली आषाढी वारी' आनंदाची आषाढी वारी, चला चला जाऊया पंढरी, || घ् || फुले जेथे भक्तीचा मळा, विठु सावळा लावी लळा, चला चला जावू भिमातिरी, आली आली आषाढी वारी, || १ || लोहदंड क्षेत्री उभी पंढरी, आवतरली चंद्रभागेतिरी, पांडुरंग-रखुमाई उभे विटेवरी, आली आली आषाढी वारी, || २ || मातृ पितृ सेवेत असतां दंग, जाहले प्रकट पाहण्या पांडुरंग, पुंडलिक नामाच्या भक्ताच्या दारी, आली आली आषाढी वारी, || ३ || धन्य धन्य तो विठु सावळा, भरतो आषाढी भक्तीचा सोहळा, भक्तांना त्यांच्या संकटी तारी, चला चला जाऊया पंढरी, || ४|| मंगेश शिवलाल बरई. हिरावाडी, पंचवटी, नाशिक -४२२००३. _________________________________________...