◾कविता :- ताई
'ताई'
ताई, आहे आईसम
माझ्यावर तुझी सावली,
आईची माया मी...
तुझ्यात गं पाहिली,
दुख:वर माझ्या...
घातली तू नेहमीच फुंकर,
झाली गं माझ्या
वेदनेची कमी काहिली,
आईची माया मी...
तुझ्याच गं पाहिली,
यश-अपयश माझं
पचवायला तू शिकवलं,
अश्रूंना माझ्या गं
हसायला तू शिकवलं,
किर्ती माझी तू,
जगी अभिमानाने गायिली,
आईची माया मी...
तुझ्यात गं पाहिली,
स्वप्नांचा माझ्या तू,
नेहमीच केला आदर,
तूझ्या अपेक्षांच्या क्षिजितांवर
गाठले यशाचे शिखर,
नवी स्वप्न भरारी ची
मी गं पाहिली,
आईची माया मी...
तुझ्याच गं पाहिली,
मंगेश शिवलाल बरई.
हिरावाडी, पंचवटी, नाशिक-४२२००३.
संपर्क-९२७१५३९२१६.
________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा