पोस्ट्स

Audio Blog लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मित्र नावाचा नातलग...ना जवळचा ना लांबचा...पण हाकेच्या अंतरावरचा...

इमेज
मित्र आणि मैत्रिणी या बद्दल एक छान फॉरवर्डेड लेख . मित्र नावाचा नातलग...ना जवळचा ना लांबचा...पण हाकेच्या अंतरावरचा.. (लेखन...डॉ.महेंद्र वंटे...) १९६५ चा जून महिना ...चार साडेचार वर्षांची बालकं .. धाकदपटशा करून बालवाडी नामक एका कौलारू खोलीत पालकांनी ढकललेल्या रडारडीच्या गलक्यात मी पण ढकलला गेलो.... कुणी हमसून हमसून तर कुणी भोकाड पसरून..पण सगळेच रडके.. ...या समूह रुदनाकडे मख्ख पणे पाहणाऱ्या जोशी बाई.. प्रत्येकाच्या डोळ्यात ‌एकमेकाविषयी सहानुभूती ..एक दोन दिवस रडण्यात गेले... मग चेहऱ्यावर निर्विकार भाव..मग हासरी आपुलकी... दोन दिवस गाळलेल्या आसवांच्या थेंबात मैत्रीची बीजं ओलावली.... अंकुरली... ...पालवली.. फुलली... आणि फूलतच राहीली.... भावनिक मुळं एकमेकात जी अडकली तो गुंता अजूनही शाबूत आहे. अ..अननसाचा...ब..बदकाचा .. पेक्षा...म... मित्राच्या ओढीने शाळेकडे पावलं खेचू लागली...कुणी चालत तर कुणी बापाच्या सायकलवर तर एखादा फटफटीवर... कुणी डॉक्टरचा, कुणी सायबाचा, कुणी शिक्षकाचा पण बरीच मोठी पिलावळ कामगारांच्या बिऱ्हाडातील......... सवर्ण,अवर्ण,गौरवर्ण,कृष्णवर्ण, गरीब,श्रीमंत. सामाजिक भेदाभेदीची...

सावली माणसाची ... Savli Mansachi | मंगेश शिवलाल बरई | New Marathi Poem | आयुष्यावर कविता | Audio Poem

इमेज
Your browser does not support the audio element. सावली माणसाची ... सावली माणसाची... आयुष्यभर त्याच्यासोबत चालणारी, सुख-दुःखात साथ निभावणारी, जिवाभावाची सखीच... सावली माणसाची... स्वच्छ प्रकाशात स्पष्ट दिसणारी, अंधारात माञ... काही काळासाठी साथ सोडणारी, सावली माणसाची... त्याच्या वयाबरोबर वाढणारी, त्याचं आस्तित्व दाखवणारी , कधी कधीतर... त्याच्यात अस्तित्वात हरवणारी, सावली माणसाची... माणसातली माणुसकी जपणारी, त्याच्या नजरेत, त्यालाच असते सावरणारी, सावली माणसाची... असली काळाबरोबर दिशा बदलणारी, तरीही... आयुष्यभर त्याच्यासमोर चालणारी. मंगेश शिवलाल बरई. हिरावाडी,  पंचवटी, नाशिक-४२२००३. Audio poem, audio story, Marathi Audiobook टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

एक प्रेरणादायी जगप्रवास अनुभव... Free Marathi Audiobook Blog | Yashacha mantra

इमेज
Your browser does not support the audio element. 🔰 एक प्रेरणादायी जगप्रवास अनुभव.. ✨ "रशियात ९० ते ११० वषे वयाची 1 कोटी लोक आहेत." सकाळी ५ वाजता उठून १० मिनिट मेडीटेशन, ६ किलोमिटर फिरणे नियंत्रीत आहार... खातांना आणि बोलतांना जिभेवर नियंत्रण. दैनंदिनी निर्व्यसनी आणि आत्मविश्वास, चिकाटी व नियोजन ह्या शिदोरीवर हे रशियन औषधीची एक मात्रा / गोळी न घेता दृष्ट लागावी असे आनंदी जीवन जगत आहेत. ह्या नास्तीक मंडळींना राग / क्रोध, तिरस्कार, द्वेष आणि अहंकार काय असतो हे संसारी असूनही माहीत नाही. एका आंतरराष्ट्रीय संमेलनात एक महिना त्यांच्या सहवासात आलेल्या माझ्या सारख्या अनेकांचा हा अनुभव. त्यांच्या मते 'क्रोध' हा लुळा असतो. 'राग' हा पांगळा असतो जसे उकाड्याने शुध्द दूध नासते तसे 'क्रोधाने' स्नेह / प्रेम / जीवन नासते. ह्या लोकांना मी बुद्धाचे / विवेकानंदाचे / ज्ञानेश्वरीचे / रामायण / महाभारत / सर्व संतांचे तत्वज्ञान सांगितले त्यावर ह्या वयोवृद्धांनी ह्या सर्वांचा सार एका वाक्यात सांगितला. "शांतीने रागाला... नम्रतेने अभिमानाला... सरळतेने मायेला तसेच सम...

आता मला जमायला लागलय | मराठी कविता | audio poem

इमेज
✨🍀✨ आता मला जमायला लागलय . आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर  जे जे मला दुखवत गेले  त्या त्या सगळ्यांना  न दुखावता सोडून देणं  *आता मला जमायला लागलयं.* संघर्षाच्या किंवा वादविवादाच्या क्षणी वाद न घालता तेथून दूर  निघून जाण्यातंच खरी परिपक्वता असते  *हे ही समजायला लागलय.* माझ्या बरोबर घडणाऱ्या  अनेक वाईट गोष्टींचा  उहापोह करून त्यात  शक्ती खर्ची घालून  आजूबाजूला जे जे उत्तम आहे त्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून जातोय *हे ही जाणवायला लागलयं.* आलेल्या अनुभवांतून बाहेर पडत स्वतःला सावरून,  इतरांना आनंदी करणे *मला आता जमायला लागलय.* कोणत्याही न पटणाऱ्या गोष्टींवर काहीही न बोलणे म्हणजे  त्यांना संमती असणे ,गरजेचे नाही, कधी-कधी काहीही न बोलणं किंवा कोणतही प्रत्युत्तर न देणं खूप काही बोलून जातं आणि सांगूनही जातं.  *हे ही कळायला लागलंय .* आपण लोकांवर किंवा त्यांच्या विचारांवर बंधन आणू शकत नाही पण स्वतः च्या मनावर मात्र बांध घालू शकतो. आपण अशा लोकांचे वागणे किती मनावर घ्यायचे, त्यांना किती महत्व द्यायचं, त्यांनी बो...

◾थोडं मनातलं :- नवरा बायको मधील प्रेमल संवाद| Marathi Audiobook | audio story

इमेज
आपल्या प्रिय बायकोचा हात हातात घेऊन चालता चालता तो म्हणाला, "मला एकदा तुझे बूट घालून चालायचंय." ती म्हणाली.. "नको रे, सोपं नाही ते... तू तुझे कष्ट झेलतोच आहेस ना, आपला प्रवास सुखात चालला आहे ना." त्याचा हट्ट म्हणून तिच्या बुटा मधला त्याचा प्रवास सुरु झाला. हिरवळीवर चालता चालता अचानक खडे टोचू लागले. करियरसाठीचा विरोध, नोकरीची वणवण, लग्न ठरल्यावरची द्विधा, माहेर सुटल्याचं दुःख, आयुष्याचा संघर्ष,  पायाला जाणवू लागला.. गरोदरपणातील अस्वस्थता बाळंतवेणा... आणि नंतर तो गोंडस स्पर्श.. रात्रीची जागरण, नोकरीतली ओढाताण... तरीही तिने नेहमी त्याच्यासाठी सुंदर दिसण्याचा केलेला प्रयत्न त्याच्यासाठी वेळ काढायची धडपड, कधी टोमणे, कधी कौतुक,  जबाबदाऱ्यांचे ओझं जाणवत होतं थोडं, थोडं केवळ तिचे बूट घालून सुद्धा काही अव्यक्त सल देखील आता टोचत होते पायाला, कधी चटके देखील बसले.. त्याने झटकन बूट काढले म्हणाला, "कसं चाललीस एवढं?"  ती हसली, म्हणाली, "तुझ्यासाठी....आपल्या लेकरासाठी....आपल्या संसारासाठी...!" 👨‍👩‍👧👧🏻😘😘😍😍🥰🥰❤️ ____________________________...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

इमेज
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम .  ..  .  या पुस्तकात माझ्या जिवनात घडलेल्या घटना मी कोण होतो या  साठी लिहित नाही तर जीवन काय असते हे सांगण्यासाठी मी हे  पुस्तक लिहित आहे - wings of fire ...  टिप :- खालील Audio book संपूर्ण ऐका आणि आवडले तर इतरांना पण  पाठवा __________________________________________ .

पर्यावरण वाचवण्यासाठी उपाय | Marathi Audio book | audio story

इमेज
पर्यावरण वाचवण्यासाठी उपाय           वाहनांचे वाढते प्रदूषण हा आपल्या वातावरणाला खूप मोठा धोका आहे. सध्याच्या आधुनिक युगात आपण आजूबाजूला पाहतो की वाहनांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे जे काही  प्रदूषण होते ते कमी करायचे असेल तर ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर लोकांनी जास्त प्रमाणात केला पाहिजे असे माझे अत्यंत स्पष्ट मत आहे. सध्या बॅटरीवर चालणारी वाहने बाजारात येत आहेत त्यांचाही वापर मोठ्या प्रमाणात झाला तर वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या   धुराचे प्रमाण कमी होईल, वातावरण स्वच्छ व शुद्ध होण्यास नक्कीच मदत होईल..           आपणास जर भाजीपाला, फळे, दूध, किराणामाल इत्यादी खरेदी करण्यासाठी जावयाचे असेल व अंतर कमी असेल तर आपण वाहना ऐवजी सायकलचा वापर केला पाहिजे. सर्वांनी आपल्या दैनंदिन कामकाजासाठी आठवड्यातून एक दिवस तरी वाहना ऐवजी सायकलचा वापर केला पाहिजे. गेल्या काही वर्षापासून मी याची स्वतःला सवय लावून घेतलेली आहे. याप्रमाणे आपण याचा आपल्या ...

मोहम्मद रफी यांची संपूर्ण मराठी गाणी | All marathi song's off mohammad rafi

इमेज
प्रभु तू दयाळू कृपावंत दाता  दया मागतो रे तुझी मी अनंता जगविण्यास देहा दिली एक रोटी  नमस्कार माझे तुला कोटी कोटी  वासना कशाची नसे अन्य चित्ता तुझ्या पावलांशी लाभता निवारा  निघे शीण सारा मिळे प्रेमधारा  सर्व नष्ट होती मनांतील खंता ज्ञान काय ठावे मला पामराला  मनी शुद्ध माझ्या असे भाव भोळा  तुझे नाम ओठी नको वेदगीता ________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

Exam worrier च्या यशाची कहाणी | Marathi Audio story | Marathi Audio book

इमेज
"किस्मत में लिखी हर मुश्किल टल जाती है...           यदि हो बुलंद हौसले तो मंजिल मिल ही जाती है... सिर उठा कर यदि आसमान को देखोगे बार बार...              तो गगन को छूने की प्रेरणा मिल ही जाती है"...! "सर परीक्षा झाली असतीनां मी 99% च मिळविले असते"...!!! ......जवेरीया महेबुबखाँ पठाण ( वर्ग 10 वी , आष्टी केंद्रातून सर्वप्रथम ) नमस्कार मित्रांनो ... सुप्रभात ...पाचेक वर्ष झाली असतील एकदा कामानिमित्त आष्टीत गेलो आणि बसस्टँड वरून पुढे निघतांना "ऐ मनोज यार ...! दोन मिनिटं ईकड ये...!!!" असा ओळखीचा आवाज आला...आमच्या तीनही भावांचा म्हणजे मी माझ्या पाठचा  डॉ. भोजराज , हेमंत यांचा कॉमन मित्र म्हणजे महेबूब पठाण याचा तो आवाज होता. जवळ गेलो पानटपरीवर गप्पांना सुरुवात झाली...महेबूब म्हणाला ," यार मनोज माझी मोठी मुलगी खुप अभ्यास करते , ती घरी सारखी अभ्यासच करत असते , आता तुच काय ते बघ ,  तुझ्याकडं क्लासला पाठवीतो ...आता तिच्या अभ्यासाची काय ती काळजी तुच घ्यायची ...आज पासुन ती आता तुझी मुलगी...!!! मी म्हणालो ," ठिक आहे ...

थोडं प्रेम स्वतः वरही... | Marathi Audio story | Audiobook

इमेज
पहिला फ्री मराठी ऑडिओ ब्लॉग ऐका आणि इतरांना पण शेअर करा | First Free Marathi Audio Blog आयुष्यात आलेला 'एखादा काळ' हा वाईट नसतोच, वाईट असते ती त्या काळातली आपली परिस्थिती, काळाशी दोन हात करतांना आपली सतत कमी पडत राहाणारी उर्जा, आपल्यातली मानसिक आंदोलने आणि त्या काळातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी आपली होत असणारी तडफड. ही तडफड जितकी जास्त होते , जगण्याची...जगण्यावर प्रेम करण्याची उर्जा तितकी जास्त वाढत जाते. दुःख माणसाला जिवंत राहाण्याची, आयुष्यावर नव्याने प्रेम करण्याची उर्मी देतं. द्यायला हवं... पण... जर आपलं स्वतःवरही प्रेम असलं तरच हे होऊ शकतं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थीपणा कधीच नसतो. ती भेट असते ...आपण स्वतःला दिलेली.  कुणीतरी येईल , आपल्याला आनंद देईल ही वाट बघत बसण्यापेक्षा आपण स्वतःच स्वतःला आनंद देणारे होऊ शकतोच पण बर्‍याचदा माणसे स्वतःवर प्रेम करण्यासाठीही इतरांची वाट पाहाण्यात आयुष्य घालवतात... प्रेम म्हणजे स्वतःपर्यंत पोहोचण्याचा प्रवास असतो. जगण्याचा प्रवास असतो. आयुष्याची ओढ असते आणि जिवंतपणाशी जुळलेली नाळ असते... ओसाड जागी पावसात दा...

◾अभंग :- भेटी लागी जीवा लागलीसे आस

इमेज
🌻 *आनंदी पहाट* 🌻            *मनाचिये वारी पंढरीची*          *भक्ती मार्गाच्या वाटेवरची*               *श्रीक्षेत्र देहूनगरीतून आज तुकोबांच्या पालखीचे प्रतिनिधिक प्रस्थान.*           🛕          🚩👣🚩                 🚩👣🚩                                          🌹⚜️🚩🔆🙏🔆🚩⚜️🌹         *परमेश्वरी शक्तीवर ज्यांचा विश्वास आहे त्यांना हे नक्कीच पटते की केव्हा कसे वागावे याची सद्बुद्धी परमेश्वरच देतो.*         *यंदा विठुरायाची इच्छा अशी की तुम्ही माझ्या भेटीसाठी येण्याची गरज नाही. त्यासाठीचे कष्ट तुम्ही उपासनेत खर्च करावेत. मानस पूजेने तुम्ही माझे चिंतन करा.*         *मनाचे वैशिष्ट्य असे की तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करता, त्या गोष्टीचा जगभर प्र...

◾जीवन मंत्र :- जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी | Marathi Audio story | Audiobook

इमेज
🌺  *जसे बोलण्यापेक्षा,* *शांत रहायला जास्त महत्व असते,* *तसेच सांगण्यापेक्षा,* *ऐकून घेण्यालाही जास्त महत्व असते.* *प्रमाणापेक्षा जास्त सुख,* *आणि प्रमाणापेक्षा जास्त दु:ख,* *कधीच कोणाजवळ व्यक्त करु नका,* *कारण...* *लोकं सुखांना नजर लावतात,* *आणि दु:खावर मीठ चोळतात.* *यशस्वी माणसे निर्णयाने जग बदलतात,* *आणि अयशस्वी माणसे जगाला घाबरून निर्णय बदलतात.* *स्वभाव हा हॉटस्पॉट सारखा असला की,* *कोणत्याही पासवर्ड ची गरज पडत नाही,* *लोक आपोआपच जुळत जातात,* *कारण...* *प्रभाव चांगला असण्यापेक्षा,* *स्वभाव चांगला असणे महत्त्वाचे असते.* *मोत्यांना तर सवयच असते विखुरण्याची,* *पण धाग्याला सवय असते,* *सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची.* *जिंकणे म्हणजे नेहमी पहिलाच नंबर येणे,* *असे नसून...* *एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करता येणे,* *यालाही जिंकणे असेच म्हणतात.* *अपने अंदर से अहंकार को;* *निकालकर स्वयं को हलका करे;* *क्योकि उंचा वही उठता है;* *जो हलका होता है;* *चांगल्या वेळेपेक्षा,* *चांगली माणसे महत्वाची असतात,* *कारण...* *चांगल्या माणसांमुळे,* *चांगली वेळ अनेक वेळा येऊ श...

◾भक्तीगीत :- एकतारी संगे एकरूप झालो

इमेज
 🌻 आनंदी पहाट 🌻 मनाचिये वारी पंढरीची सफल जीवनाचे रहस्य सांगणारी 🌹⚜️🌸🚩🛕🚩🌸⚜️🌹     *देवाचिये द्वारी उभा क्षणभरी*     *तेणें मुक्ती चारी साधियेल्या*     *हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा*     *पुण्याची गणना कोण करी*                 मुक्ती म्हणजे आनंद. "न लगे मुक्ती धनसंपदा.. संत संग देई सदा" असं तुकोबा म्हणतात. संत भक्तीचा उपाय हा नामस्मरण सांगतात. पंढरी वारीमध्ये संत सहवास लाभतो तो नामस्मरणाने. त्याने सुखोपभोगी जीवनाचा खरा अर्थ सांगणारी दृष्टी लाभते.         माऊली म्हणतात.. देवाच्या दारात क्षणभर जरी उभे राहिले तरी सलोकता, समीपता, सरुपता आणि सायुज्यता या चारही मुक्तीचा लाभ होतो.         मुक्ती म्हणजे खरा आनंद. सलोकता म्हणजे ही जगताची सृष्टी भगवंताची आहे, त्याचे सानिध्य मला आहे. समीपता म्हणजे तो सदैव माझ्याच सोबत आहे. सरुपता म्हणजे मी त्याचाच अंश आहे. सायुज्यता म्हणजे तो आणि मी वेगळे नाहीच. हा मुक्तीचा अर्थ पटतो आणि मग सर्वदूर.. प्रत्येकामध्ये विठ्ठलच दिसतो.. इतर...

◾अभंग :- ऊठ ऊठ पंढरीनाथा | mp3 abhang download | marathi song

इमेज
       🌻 आनंदी पहाट 🌻          !! मनाचिये वारी पंढरीची !!   विठुरायाला भक्तांच्या विनवणीची 🌹⚜️🌸🚩🛕🚩🌸⚜️🌹     हरीच्या भजनें हरीचे भक्त     हरीचे भक्त ।     झाले विख्यात भूमंडळीं ॥     तरोनि आपण तारिले आणिका ।     वैकुंठनायका प्रिय झाले ॥     ज्यांचे ध्यानी मनीं हरी ।     राहिला निरंतरीं दृष्टीपुढें ॥             ......संत निळोबा         पिंपळनेरच नाहीतर शिरुर.. पारनेर या अहमदनगर जिल्ह्यातील गावाची ओळख आहे संत निळोबांच्या गुरुभक्तीमुळे.         संत निळोबांची पालखी यंदाच्या मनाचिये वारीत आहे. संत निळोबा हे गुरुभक्तीचे आदर्श. असिम श्रद्धा आणि विश्वास या बळावरच जग चाललेय. संत निळोबा हे संत तुकाराम महाराजांचे शिष्य.. निस्सिम भक्त. तुकोबांचे जीवन.. विठ्ठल भक्ती आणि अभंग ऐकून त्यांनी शिष्यत्व पत्करले. त्यांचे तुकोंबांवर एवढे प्रेम की ते म्हणतात..       तुका ध्यानी, तुका मनी । ...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण