माणसाच्या स्वभावाचा अंदाज घेण्याचे अनेक मार्ग आहेत . हस्ताक्षर, सही, दिसणे ,काही लकबी, वगैरे पण कधीकधी असे वाटते की पंगतीत वाढलेले ताट जेवताना,जेवण्याच्या आधी / नंतर त्याची जी प्रतिक्रिया असते त्यावरूनहि त्याच्या स्वभावाचा थोडा अंदाज येऊ शकतो. म्हणजे बघा ..... समोर जेवणाचे ताट वाढून झाले आहे आणि आता खायला सुरुवात करायची आहे तेव्हा तो पहिला पदार्थही त्याच्या स्वभावाला अनुसरून उचलतो. जसे की पुरण किंवा त्याबरोबरचे गोड पदार्थ पहिल्यांदा उचलणारी माणसे स्वभावाने पण गोड असतात, तळण,पापड उचलणाऱ्या माणसांचा पापड लवकर मोडतो, त्यांच्यात patience कमी असतो. वरणभात पहिल्यांदा खाणारी माणसे त्याप्रमाणेच साधी सरळ असतात ,ती कुठेही, कोणत्याही परिस्थितीत राहू शकतात. भजी उचलणारी माणसे भज्या सारखीच कुरकुरीत,नर्मविनोदी आणि गप्पात प्रसन्नता आणणारी असतात,यांच्या सोबत असताना कधी कंटाळा येत नाही. जेवणाची सुरुवात खिरीपासून आणि शेवट दहिभाताने करणारी नियम पाळणारी, आणि बऱ्यापैकी निरोगी असतात, लोणचे कुठले आहे ? आंब्याचे, लिंबाचे का मिक्स हे पाहणारे आंबटशौकीन अ...