इतकं जगून झालं पण जगायला वेळ नाही जगतो आहोत पण कशासाठी हेच माहित नाही धाव धाव धावत आहोत पण दिशाच कळत नाही सर्वकाही करत आहोत पण कोणासाठी माहिती नाही एक क्षण येईल असा घेऊन जाईल हा श्वास आपला अर्ध्यामधी थांबलेला असेल हा जीवन प्रवास आणखी पण वेळ आहे थोडं तरी जगून घ्यायला सुंदर अशा जगाला डोळे भरून बघायला