◾गीत :- शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी
꧁ 🌻आनंदी पहाट🌻 ꧂
⚜⚜⚜
शुभविवाह मंगलपर्व विशेष
⚜⚜⚜
💞🥀🌸🔆💑🔆🌸🥀💞
स्वप्न ही सगळेच बघतात. रम्य स्वप्न उराशी बाळगून केलेली वाटचाल ही पण जीवनाला अर्थ देते. त्या वाटचालीतही आगळे समाधान प्राप्त होते.
आता आज आकाशात तो शुक्रतारा उगवलाय.. तळ्याच्या पाण्यात सर्वत्र ते आल्हाददायक चांदणेच दिसतेय छान मंदमंद वारा वाहतोय आणि ज्याच्या सोबतीने आजन्म वाटचाल करावी असे वाटले, तो सहकारी भेटल्याने नकळत गाणे गुणगुणले जातेय की तू अशीच जवळ रहा.. माझ्या डोळ्यांत डोळे मिसळून रहा.
आज हा आनंद शब्दा पलिकडचा. या भावना शब्दांत वर्णन करणे अशक्यच. पण तू मात्र ते समजून घे. तूला फुलांसारखे कोमल मन लाभलेय. त्याच्या गंधाने अंतरंगात स्पंदने निर्माण होत अंग शहारुन गेलेय. या सुखद स्वराने मी पुर्णपणे भारावून गेलोय. या सुखद स्वरांनी जन्मभर सोबत करावी. माझे स्वप्न आज सत्यात उतरलेय.
🌹🔆🥀👁❣👁🥀🔆🌹
*_शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी_*
*_चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी_*
*_आज तु डोळ्यांत माझ्या..._*
*_आज तु डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा_*
*_तु अशी जवळी रहा, तु अशी जवळी रहा_*
*_मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला?_*
*_तु तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला_*
*_अंतरीचा गंध माझ्या..._*
*_अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा_*
*_तू असा जवळी रहा, तू असा जवळी रहा_*
*_लाजऱ्या माझ्या फुला रे, गंध हा बिलगे जिवा_*
*_अंतरीच्या स्पंदनाने अन थरारे ही हवा_*
*_भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा_*
*_तू अशी जवळी रहा, तू अशी जवळी रहा_*
*_शोधिले स्वप्नात मी ते करी जागेपणी_*
*_दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी_*
*_वाकला फांदीपरी..._*
*_वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा_*
*_तू असा जवळी रहा, तू असा जवळी रहा_*
🌺💫🌸🌟🌺🌟🌸💫🌺
*गीत : मंगेश पाडगांवकर* ✍
*संगीत : श्रीनिवास खळे*
*स्वर : अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा*
___________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा