पोस्ट्स

सप्टेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

घरटे उडते वादळात, बिळात वारुळात पाणी शिरते, कोणती मुंगी, कोणते पाखरू, म्हणून आत्महत्या करते | Poem Lyrics

घरटे उडते वादळात, बिळात वारुळात पाणी शिरते, कोणती मुंगी, कोणते पाखरू, म्हणून आत्महत्या करते  प्रतिकूल परिस्थितीत, वाघ लाचारीने जगात नाही. आणि शिकार मिळाली नाही म्हणून, कोणतं अनुदान मागत नाही. घरकुलासाठी मुंगी करते का अर्ज? स्वतःच उभारते वारुळ, कोण देतो गृह कर्ज?  हात नाहीत सुगरणीला, फक्त चोच घेऊन जगते, स्वतःच विणते घरटे छान, कोणते पॅकेज मागते. कुणीही नाही पाठी, तरी तक्रार नाही ओठी. निवेदन घेऊन चिमणी, फिरते का कोणत्या योजनेसाठी? घर धन्याच्या संरक्षणाला धावून येतो कुत्रा. आणि लाईफ इन्शुरन्स काढलस का? असं विचारत नाही मित्रा. राब राब राबून बैल कमावून धन देतात. सांगा बरं कोणाकडून ते निवृत्ती वेतन घेतात? अरे कुणब्याची जात आपली, आपणही हे शिकलं पाहिजे. पिंपळाच्या रोपासारखं पाषाणावरही टिकलं पाहिजे. कोण करतो सांगा त्यांना, पुरस्काराने सन्मानित? मोर पसरतो पिसारा अन कोकीळ गाते मधुर गीत. मधमाशीची दृष्टी ठेवा फुलांची कमी नाही. आणि मधाच्या पोळ्यासाठी मित्रांनो कोणतीच रोजगार हमी नाही.

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी