◾भक्तीगीत :- देव माझा विठू सावळा | mp3 abhang download | marathi song
🌻 आनंदी पहाट 🌻
!! मनाचिये वारी पंढरीची !!
सत्संगींच्या सहवासातील
🌹⚜️🌸🚩🛕🚩🌸⚜️🌹
चंदनाचे झाड परिमळे वाढ ।
त्याहुनी कथा गोड विठ्ठलाची ॥
परिमळू सुमने जाई जुई मोगरे ।
त्याहुनी साजीरे हरि आम्हा ॥
आम्हा धर्म हरि आम्हा कर्म हरि ।
मुक्ती मार्ग चारि हरि आम्हा ॥
.....संत निवृत्तीनाथ महाराज
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर ही निवृत्तिनाथांच्या वास्तव्याने पुनीत अशी संतभूमि. भारतीय संस्कृतीने प्रदान केलेली विश्वातील सर्वश्रेष्ठ अशी विश्वकल्याणाची माऊलींची प्रार्थना म्हणजे पसायदान. हे उदार हृदयी पसायदान जन्मले निवृत्तिनाथ कृपेने. निवृत्तिनाथांच्या आज्ञेने माऊलींनी आपल्या स्वतंत्र प्रज्ञेने संस्कृत गीतेवर सुलभ मराठीत ज्ञानेश्वरी लिहिली आणि ती जगविख्यात ठरली.
यंदाही मनाचिये पंढरी वारीत दहा पालखीमध्ये निवृत्तिनाथांची पालखी आहे. भागवत धर्माचे निवृत्तिनाथ हे आद्यगुरु. त्यांनी ज्ञानेश्वर.. सोपानदेव.. मुक्ताबाईंचा सांभाळ तर केला. त्यांचे गुरु झाले. भागवत धर्माचे सारेच संत त्यांचे मोठेपण मान्य करुन वंदन करतात.
या पंढरीच्या राजाची.. विठ्ठलाची कीर्ती किती वर्णावी.. चंदनाचा सुगंधसुद्धा कमी पडावा. त्या सुगंधापेक्षाही गोड अशी विठ्ठल कथा आहे. जाई, जुईच्या फुलांचा सुगंधही फिका पडावा. हा सुंदर स्वरुपी विठ्ठल आम्हांला धर्म शिकवतो तो चांगल्या कर्माचा. आईवडिलांच्या सेवेचे संस्कार घडविण्यासाठीच तो पंढरीस आला. जो चांगली कर्म करण्याचा धर्म पाळेल त्याच्यासाठी हा विठ्ठल चारही मुक्तीची व्दारे उघडेल.
मनाचिये वारी पंढरीस टाळ.. मृदुंग गजरात विठ्ठल नामाच्या जयघोषात वाटचाल करतेय. समस्त जनतेच्या मनात देववृत्ती.. निर्मळ असा देवभाव या पंढरी वारीत सत्संगामुळे जागृत होतोय. सत्संग मार्गानेचं मन हे अहंकार मुक्त.. निस्वार्थ.. निस्पृह होत भक्तांना देवाचे दर्शन घडतेय. विठ्ठल हे या भक्तांच्या मनात दडलेल्या वृत्तीचे.. पवित्र देवभावाचे प्रतिकच. ह्या विठ्ठलाच्या पंढरपूरला राहण्याने जणू या पृथ्वीवर आनंदी वैकुंठच अवतरले आहे.
निस्संग वारकरी या विठ्ठलाला भेटतात. तेव्हा त्याचे दिव्य अलौकिक दर्शन त्यांना घडते. लाखों जनसामान्यांप्रमाणे त्यानेपण सावळा रंग धारण केलाय. त्याची आवड सामान्यांशी साधर्म्य सांगणारी आहे.*
*मानवी जीवनात अत्यंत उपयोगी असलेली बहुगुणी तुळस ही या विठ्ठलाला प्रिय आहे. त्या तुळशीच्या माळा तो आनंदाने घालतोय. कपाळी चंदनाचा टीळा लावलाय. त्याचे हे विलोभनीय रुप बघणे हे भाग्यच.*
*भीमाकाठी शेकडो मैल चालत येत भक्त जेव्हा टाळ मृदुंगाच्या साथीने विठ्ठल नामाच्या गजरात.. अभंग गायनात धुंद होत नामाच्या अत्यानंदाने नाचू लागतात, तेव्हा त्या स्वर्गीय स्वरसूरांनी आनंदून विठ्ठलही भक्तांसोबत त्या आनंदात सामील होतोय.*
*विठ्ठलाला या निष्पाप भक्तांचा लळाच लागलाय. भक्तांचा देवभाव जागृत झाल्याने सारे जगच त्यांना आपले.. सुंदर वाटतेय. भक्तांच्या सभोवताली वैष्णवांचे असे सुरक्षित.. सुंदर.. आनंदी जग निर्माण झालेय.*
🌹⚜🌸🔆🛕🔆🌸⚜🌹
*_देव माझा विठू सावळा,_*
*_माळ त्याची माझिया गळा_*
*_विठु राहे पंढरपुरी,_*
*_वैकुंठच हे भूवरी_*
*_भीमेच्या काठी डुले,_*
*_भक्तीचा मळा_*
*_साजिरे रूप सुंदर,_*
*_कटी झळके पीतांबर_*
*_कंठात तुळशीचे हार,_*
*_कस्तुरी-टिळा_*
*_भजनात विठू डोलतो,_*
*_कीर्तनी विठू नाचतो_*
*_रंगुन जाई भक्तांचा_*
*_पाहुनी लळा_*
🌻🌸🛕🔆🙏🔆🛕🌸🌻
*रचना : कवी सुधांशु* ✍️
*संगीत : दशरथ पुजारी*🎹
*स्वर : सुमन कल्याणपूर*🎤
*🎼🎶🎼🎶🎼* 🎧
____________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा