◾कविता :- त्याग मूर्ती
झालेत खुप आता
स्त्रीयांवर अत्याचार
सदोदितच असे
तीच्या डोळयाला धार...
कुठपर्यंत ती आता
सारे सहन करील
कोणा कोणाचे ती
रोजच्या पाय धरील...
नेहमी नेहमी तिनेच
का घ्यावा कमीपणा
तिचेही मन आणि
भावना जरा जाणा...
तिही असे एक माणुस
वागा जरा तिच्या परीनं
जीवनाच तुमच्या
सोनं ती करीनं...
वेळ प्रसंगी तिच्यातही
अवतरते भवानी
व्यर्थ तुमची मग
वाया जाईल जवानी...
स्त्री आहे खरी एक
त्याग मुर्ती वसुंधरा
तिच्या सवे आपण
प्रेमानेच संसार करा...
**********************
✍️ - आत्माराम रामदास शेवाळे
'' शब्दस्नेही " वाघोली
ता.शेवगाव
*************************
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा