असं का होतं...? असं का होतं की ज्या गोष्टीची भीती वाटत असते, नेमकी तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणुन हजर होते." एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्याच विषयात का बरं नापास होतो? पैसे नाहीत, पैसे नाहीत, अशी घोकणारा का दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल का बरं होतो? आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्याला कसलातरी आर्थिक फटका बसतोचं बसतो, कष्ट नकोत, कष्ट नकोत, असं घोकणार्याच्या नशिबातंच श्रम आणि राबणं असतं का बरं असत? का बरं एखादीला नको असलेलं गावचं ‘सासर’ म्हणुन पदरात पडतं? का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिकाधिक गरीब होतातं? तर ह्या सगळ्यासाठी एकचं कारण आहे, आणि ते कारण आहे *आकर्षणाचा सिद्धांत* लॉ ऑफ अट्रॅक्शन.. तुम्हाला माहीतीय का ?...जगातील फक्त तीन टक्के लोकांकडे एकुण संपत्तीच्या शहाण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे. हा केवळ योगायोग नाही मित्रांनो, हा आकर्षणाचा नियम आहे. काय सांगतो हा नियम? "तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट,घटना ही कळत नकळत तुमच्या विचारांनीचं आकर्षित केलेली असते. जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, तुमचा ज...