पोस्ट्स

Arjun लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मित्र नावाचा नातलग...ना जवळचा ना लांबचा...पण हाकेच्या अंतरावरचा...

इमेज
मित्र आणि मैत्रिणी या बद्दल एक छान फॉरवर्डेड लेख . मित्र नावाचा नातलग...ना जवळचा ना लांबचा...पण हाकेच्या अंतरावरचा.. (लेखन...डॉ.महेंद्र वंटे...) १९६५ चा जून महिना ...चार साडेचार वर्षांची बालकं .. धाकदपटशा करून बालवाडी नामक एका कौलारू खोलीत पालकांनी ढकललेल्या रडारडीच्या गलक्यात मी पण ढकलला गेलो.... कुणी हमसून हमसून तर कुणी भोकाड पसरून..पण सगळेच रडके.. ...या समूह रुदनाकडे मख्ख पणे पाहणाऱ्या जोशी बाई.. प्रत्येकाच्या डोळ्यात ‌एकमेकाविषयी सहानुभूती ..एक दोन दिवस रडण्यात गेले... मग चेहऱ्यावर निर्विकार भाव..मग हासरी आपुलकी... दोन दिवस गाळलेल्या आसवांच्या थेंबात मैत्रीची बीजं ओलावली.... अंकुरली... ...पालवली.. फुलली... आणि फूलतच राहीली.... भावनिक मुळं एकमेकात जी अडकली तो गुंता अजूनही शाबूत आहे. अ..अननसाचा...ब..बदकाचा .. पेक्षा...म... मित्राच्या ओढीने शाळेकडे पावलं खेचू लागली...कुणी चालत तर कुणी बापाच्या सायकलवर तर एखादा फटफटीवर... कुणी डॉक्टरचा, कुणी सायबाचा, कुणी शिक्षकाचा पण बरीच मोठी पिलावळ कामगारांच्या बिऱ्हाडातील......... सवर्ण,अवर्ण,गौरवर्ण,कृष्णवर्ण, गरीब,श्रीमंत. सामाजिक भेदाभेदीची

सोडून द्यावं | marathi poem | जीवनावर कविता

इमेज
 🙏🏻😊 सोडून द्यावं 😊🙏🏻 🍁 एकदोन वेळा समजावून  सांगूनही पटत नसेल तर समोरच्याला समजावणं *सोडून द्यावं* 🍁 🍁 मुलं मोठी झाल्यावर स्वतंत्रपणे  निर्णय घेत असतील  तर पाठीमागे लागणं  *सोडून द्यावं* 🍁 🍁 मोजक्याच लोकांशी ऋणानुबंध जुळतात, एखाद्याशी नाही पटलं तर बिघडलं कुठं *सोडून द्यावं* 🍁 🍁 एका ठराविक वयानंतर  कोणी नावं ठेवली तर मनावर घेणं  *सोडून द्यावं* 🍁 🍁 आपल्या हातात काही नाही, हा अनुभव आल्यावर इतरांची वा भविष्याची चिंता करणं  *सोडून द्यावं* 🍁 🍁 इच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागलं तर स्वतःकडून अपेक्षा करणं *सोडून द्यावं* 🍁 🍁 प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं,  आकार, रंग सगळंच वेगळं म्हणूनच म्हणतो तुलना करणं  *सोडून द्यावं* 🍁 🍁 आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्यानंतर रोज जमा खर्चाची मांडणी करणं   *सोडून द्यावं* 🍁 *समजलं तर ठीक नाहीतर हे ही सोडून द्यावं* 🙏🏻🙏🏻 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-  सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

आता मला जमायला लागलय | मराठी कविता | audio poem

इमेज
✨🍀✨ आता मला जमायला लागलय . आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर  जे जे मला दुखवत गेले  त्या त्या सगळ्यांना  न दुखावता सोडून देणं  *आता मला जमायला लागलयं.* संघर्षाच्या किंवा वादविवादाच्या क्षणी वाद न घालता तेथून दूर  निघून जाण्यातंच खरी परिपक्वता असते  *हे ही समजायला लागलय.* माझ्या बरोबर घडणाऱ्या  अनेक वाईट गोष्टींचा  उहापोह करून त्यात  शक्ती खर्ची घालून  आजूबाजूला जे जे उत्तम आहे त्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून जातोय *हे ही जाणवायला लागलयं.* आलेल्या अनुभवांतून बाहेर पडत स्वतःला सावरून,  इतरांना आनंदी करणे *मला आता जमायला लागलय.* कोणत्याही न पटणाऱ्या गोष्टींवर काहीही न बोलणे म्हणजे  त्यांना संमती असणे ,गरजेचे नाही, कधी-कधी काहीही न बोलणं किंवा कोणतही प्रत्युत्तर न देणं खूप काही बोलून जातं आणि सांगूनही जातं.  *हे ही कळायला लागलंय .* आपण लोकांवर किंवा त्यांच्या विचारांवर बंधन आणू शकत नाही पण स्वतः च्या मनावर मात्र बांध घालू शकतो. आपण अशा लोकांचे वागणे किती मनावर घ्यायचे, त्यांना किती महत्व द्यायचं, त्यांनी बोललेल्या गोष्टी किती डोक्यात साठवायच्या आणि स्वतःचे आयुष्य खराब क

माझा जन्म का झाला आहे ?

इमेज
काय माहित ,काय आहे हे जीवन .कधी दुःख कधी सुख काय  शेवट असेल, काय जगणं असेल, जे ठरवलं ते जिवनात असेल का नसेल .  काही गोष्टी हाताने घडतात तर काही आपोआपच घडतात पण प्रत्येक गोष्ट आयुष्यात कधीच न विसरतात.  कधी मी चुकेल कधी पुढची व्यक्ती चुकेल म्हणजे काय नातं संपेल...  एक गोष्ट आयुष्याने मला खूप चांगली शिकवलीय जी गोष्ट आपल्यासोबत होऊ नये वाटते  ती इतरांसोबत वागू नये. ..  आयुष्य एक नाटक आहे का रंगमंच हे आपण आपले आपण ठरवायचे. . .  मान्य आहे सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात पण ती समस्या ती गोष्ट कशी handle करायचे थोडा विचार केला तर नक्की कळेल ✅

माझ्या जिवनातील निवडक किस्से

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

मोहम्मद रफी यांची संपूर्ण मराठी गाणी | All marathi song's off mohammad rafi

इमेज
प्रभु तू दयाळू कृपावंत दाता  दया मागतो रे तुझी मी अनंता जगविण्यास देहा दिली एक रोटी  नमस्कार माझे तुला कोटी कोटी  वासना कशाची नसे अन्य चित्ता तुझ्या पावलांशी लाभता निवारा  निघे शीण सारा मिळे प्रेमधारा  सर्व नष्ट होती मनांतील खंता ज्ञान काय ठावे मला पामराला  मनी शुद्ध माझ्या असे भाव भोळा  तुझे नाम ओठी नको वेदगीता ________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

इमेज
जीवनावर गहन सत्य सांगणारी अशीच एक माझी कविता     उद्याा काय होणार कोणास माहीत    । आज जे आहेत ते उद्यास नाहीत   ।।धृ ।। माणसा जीवन हे विशिष्ट  । क्षणोक्षणी त्यात कितीतरी कष्ट ।। त्या कष्टास चल तू सोशीत ।।१।।  जीवन हे एक दुःखाचा बाजार । सुख  लोभाचा रे त्यास आजार ।।  त्या आजारास चाल तू विसरित ।।२।।  जीवन सुख दुःखाचा खेळ  क्षणोक्षणी संपते येते वेळ  वेळेचे जाणुनी घे हित ।।३।। एकदाच येते हे जीवन । वाग सर्वां सोबत आनंदानं ।। आनंदात राहा गात गीत ।।४।। जसं दिल देवान जिवन । तसं तोच देईल मरण ।। मरणास नको जाऊ तू भीत ।।५।। -©arjun apparao jadhav    व्हिडिओ रूपेे कविता असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आमचे   YouTube   चैनल   सबस्क्राईब   करा दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील  Whatsapp  व  Teligram   समुहा मध्ये सहभागी व्हा  -{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 📱 आवडल्यास नक्की शेअर करा 📱 धन्यवाद ह्या पैकी काय वाचायचे आहे ❓   कविता   बोधकथा   ललित लेख   जिवन मंञ   यशाचा मंञ   व्यवसाय   आरोग्य   विज्ञान व्हिडिओ विशेष लेख व्यक्ति परिचय गझल करिअर माहिती खालील पुस्त

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...