माणसाचं मन आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टींना जबाबदार असते.चुकीच्या विचारांनी बांधले जाणारे बंध व सगळ्या त्रासापासून सोडवण्यासाठी मन पुरेसं आहे.म्हणून सगळ्या त्रासातून सुटका होऊन प्रसन्न जीवन जगण्यासाठी फक्त शरीरच नाही तर मनातले विष म्हणजेच घाण काढून टाकणे देखील आवश्यक आहे.ह्यालाच माइंड डिटॉक्स म्हणतात. आपलं नक्की काय चुकतंय? व्हायरस/बॅक्टेरिया सारखा बाह्य घटक शरीरात शिरला तर काय होईल?आपण आजारी पडता व आपले शरीर सामान्य पणे कार्य करत नाही.त्याच प्रमाणे,जेव्हा चुकीचे विचार/ चुकीच्या सवयी तुमच्या मनात प्रवेश करतात,तेव्हा तुमचे मन देखील विष/घाणाने भरलेले असते.मन विषारी बनल्यामुळे, तुम्हाला आळस,थकवा,शरीर दुखणे, १ प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या भोवती वावरते. तुम्हाला काहीजण हे सांगताना दिसतात “मूड खराब आहे,बरे वाटत नाही,इच्छा नाही, फ्रेश वाटत नाही” अशा वाक्यांसह वारंवार कारणे देताना आढळतील. हेच कारण आहे की आपल्या शरीरासह,आपल्याला दररोज आपल्या मनाला डिटॉक्स करणे देखील आवश्यक आहे. जर तुम्हालाही गेल्या काही दिवसांपासून खूप नकारात्मक वाटत असेल आणि तुम्हाला कोणतेही काम करताना उत्साह वाटत ...