आला वसंत ऋतू हा , गातो हासतो नाचत । जादू करतो मनाला , चराचर फुलवित ॥ रंग भरीत वसंत , पहा येतसे जगती । उपवन बहरुन , गीत कोकीळा ही गाती ॥ दहा दिशा बहरुन , येतो राजा हा ऋतूचा । आधि सुगंधाचे रुप , येतो मोहर आंब्याचा ॥ येता घेऊन पळस , रंग केशरी उडतो । दिमाखात डौलदार , आम्रतरु मोहरतो ॥ दिसे गुलमोहर हा , लाल फुलांनी सजला । येता चाहुल वसंत , वसंत आल्याचे वदला ॥ फुल अंगणी फुलले , ' शुभ्र सुगंधी मोगरा । खेळी पवन आकाशी , सारा हिरवा दुलारा ।। दूर आळस सारुन , सारी सृष्टी बागडते । ऋतू वसंत झुमत , आम्हा सर्व आवडते ॥ ग्रीष्म हा तापू लागला , ऊन कडक तिडके । खुप तापली जमीन , जागोजागी पडे तडे || ======================= *महेन्द्र सोनेवाने , “ यशोमन "* *गोंदिया* ======================= टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- स दर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅