◾कविता :- विस्कटलेले आयुष्य | संजय धनगव्हाळ
विस्कटलेले आयुष्य
******************
जगायच होतं तिला
कोरकरकरीत आयुष्य
तिच्या राजकुमारासाठी
नी् नवरी होवून तिला
नव्या घरचा उबंरठा
ओलांडायचा होता
पण या माणसांच्या गर्दीत
विटाळलेल्या नजरांनी
तिच्यावर घाव घातला
आणि भातुकलीचा खेळ
नको त्या उंबरठ्यावर
आणून सोडला
ती रडत होते ओरडत होते
आक्रोश तिचा कोणीच
एकत नव्हते
तिची वेदनाही कोणालाच
कळत नव्हती
आयुष्याचे लक्तरे होतांना
ती रोज नव्याने पहात होती
कुठे कसा मांडावा
भातुकलीचा खेळ
तिलाच कळत नव्हते
विस्कटलेले आयुष्य ती
रोज जगतं होते
जगावं कि मरावं
प्रश्न तिच्यासाठी गंभीर होता
त्या गुलाबी मंबईचा उंबरठाही तिला ओलांडता येत नव्हता
जेव्हा जेव्हा ती
सुर सनईचे एकायची
तेव्हा झाकून घ्यायची देहावरचे शापित स्पर्श
आणि घरावरून जाणारी लग्नाची वरात
ती दारात ऊभी राहून पहायची
जणू तिला घ्यायला राजकुमार आलाय
म्हणून एकसारख बघायची
संजय धनगव्हाळ
धुळे
९४२२८९२६१८
________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
आपल्या ब्लॉगमुळे आमची कविता अनेकांपर्यंत पोहचते अनेकांना वाचायला मिळते आपला ब्लॉग मुळेच अनेकाशी ओळख होते अपण आमच्यासारख्यांसाठी खुप मोठी संधी उपलब्ध करून दिली आपले खुप आभारी
उत्तर द्याहटवाधन्यवाद
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवाधन्यवाद संजय सर
हटवा