Exam worrier च्या यशाची कहाणी | Marathi Audio story | Marathi Audio book
यदि हो बुलंद हौसले तो मंजिल मिल ही जाती है...
सिर उठा कर यदि आसमान को देखोगे बार बार...
तो गगन को छूने की प्रेरणा मिल ही जाती है"...!
"सर परीक्षा झाली असतीनां मी 99% च मिळविले असते"...!!!
......जवेरीया महेबुबखाँ पठाण ( वर्ग 10 वी , आष्टी केंद्रातून सर्वप्रथम )
नमस्कार मित्रांनो ... सुप्रभात ...पाचेक वर्ष झाली असतील एकदा कामानिमित्त आष्टीत गेलो आणि बसस्टँड वरून पुढे निघतांना "ऐ मनोज यार ...! दोन मिनिटं ईकड ये...!!!" असा ओळखीचा आवाज आला...आमच्या तीनही भावांचा म्हणजे मी माझ्या पाठचा डॉ. भोजराज , हेमंत यांचा कॉमन मित्र म्हणजे महेबूब पठाण याचा तो आवाज होता. जवळ गेलो पानटपरीवर गप्पांना सुरुवात झाली...महेबूब म्हणाला ," यार मनोज माझी मोठी मुलगी खुप अभ्यास करते , ती घरी सारखी अभ्यासच करत असते , आता तुच काय ते बघ , तुझ्याकडं क्लासला पाठवीतो ...आता तिच्या अभ्यासाची काय ती काळजी तुच घ्यायची ...आज पासुन ती आता तुझी मुलगी...!!! मी म्हणालो ," ठिक आहे पाठव...!!!
दुसऱ्या दिवशीच जवेरीया क्लासला आली ...तेथून पुढे आमच्या मार्गदर्शनांत तिचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला ...अतिशय कुशाग्रबुद्धी , क्लासला नियमित वेळेवर हजर ...गणित , बुद्धिमत्ता , ईंग्रजी विषयांची प्रचंड आवड ...तिच्या वडीलांप्रमाणे हिंदी गाण्यांचीही खुप आवड आणि बरेच गाणे मुखपाठ ...अभ्यासासह ईतर सर्वच क्लासच्या कार्यक्रमात सर्वांत आधी सहभाग ...कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असो ...स्पर्धा असो यांत ती हीरीहीरीने भाग घेणार म्हणजे घेणारच...! ...ई.सर्व गुणांनी संपन्न अश्या ह्या माझ्या लेकीला शिकवीताना मला मनस्वी फार समाधान लाभत असे ...कधीच कोणत्याच परिक्षेत कोणत्याच प्रकारची कॉपी करायची नाही ...पर्सेंटेज पेक्षाही नॉलेज अतिशय महत्त्वाच ...असं वारंवार सर्वांच्या मनावर मी बिँबवित असतो ...तिनेही आज पर्यंतच्या क्लासच्या दर रविवारी होणाऱ्या साप्ताहिक परिक्षेत नेहमी पैकी च्या पैकी गुण घेतलेत...अतिशय बुद्धिमान व सर्व मित्रांशी अतिशय स्नेहाचे नाते जपणारी जवेरीयाला तिचे मित्र - मैत्रिणी "सफा" म्हणतात ...सर्वगुणसंपन्न असेलेल्या जवेरीयाने आज तिच्या कष्टाचे सार्थक केले...!!! भलेही परीक्षा झाली नसेल ...परंतु वर्ग 7 वीत असतांनाच ," सर मला ना IIT त जायचंय मला खुप मोठ्ठी आयआयटीयन ईंजिनियर व्हायचय आणि तेच माझं स्वप्न आहे, त्या साठी काय करावं लागेल.? मी म्हणालो ," फक्त अभ्यास ...अभ्यास ...आणि फक्त अभ्यासच...!!! आणि ति तो अभ्यास न चुकता सातत्यपूर्ण करतेय सुद्धा...मला खात्रीच आहे ती तिचं स्वप्न निश्चितच पूर्ण करणारं...!!! काल परवा जाहीर झालेल्या वर्ग 10 वी च्या निकालात ती आष्टी केंद्रातून सर्वप्रथम आली आणि तिने तिच्या स्वप्ना कडे झेप घेण्यासाठी पहिली पायरी पार केली... जगद्गुरु विश्ववंदनीय संत तुकाराम महाराज म्हणतात ..."कुळी कन्या पुत्र होती जीं सात्विक तयाचा हरीक वाटे देवा"...|| ही उक्ती खरोखरच आज सत्यात उतरली...
जवेरीयाचे आई - वडीलही खरोखरच अभिनंदनांचे धनी आहेतच ...!!! दोघांच्या पाठिंब्यामुळे च ती हे शैक्षणिक यश प्राप्त करू शकली, आपली उपजीविका भागवून पानटपरीचा छोटासा व्यवसाय सांभाळून त्यांनी आपल्या मुलींना उच्च शिक्षण देण्याचं स्वप्न बघितलंय...!!! 11 वी / 12 वी व IIT साठी JEE ईत्यादी परीक्षांच्या तयारी साठी कोचिंग साठी प्रचंड खर्च लागणार तरीही काहीही करून लेकीचं शिक्षण पूर्ण करणारच ...!!! या निर्धाराने सौ.पठाण , व महेबुब कष्ट करतायत ...दोघांचेही कौतुक करावे तितके कमीच...!!!...आम्ही खरोखर निमित्तमात्र...!!!_
जवेरीयाला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...!!! असेच यापेक्षाहि काकणभर सरस यश तु मिळवावे ही सदिच्छा...तुझे सर्व स्वप्न पूर्ण होवोत ही सदिच्छा...!!!
🙏🙏🙏
प्रा.मनोजकुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड
🙏🙏
सचालक
GAIKWAAD OACHING CLASSES ASHTI
_________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा