'बाप्पा माझा लाडका' बाप्पा माझा लाडका, चिंतामणी तो, सर्वांची चिंता हारी, संकटी जगा तारी, बाप्पा माझा लाडका, विघ्नेश्वर तयाचे नाव, पुजिता जे भक्त, त्या भक्तांना, नसे विघ्न ठाव, बाप्पा माझा लाडका, वरद विनायक तयाचे नाव, भक्ती भावाने फुलला भक्तांचा गाव, बाप्पा माझा लाडका, असे गिरीजा सुत, म्हणून गिरीजात्मक तयाचे नाव, दिसे तयाच्या नजरेत मातृ भाव, बाप्पा माझा लाडका, आहे तो महागणपती, सर्व गुणांचा अधिपती, प्रत्येक कामाच्या शुभारंभाआधी, भकतगण त्याला पुजती, मंगेश शिवलाल बरई. हिरावाडी, पंचवटी, नाशिक-४२२००३. संकष्टी चतुर्थी च्या सर्वांना शुभेच्छा. ➖➖➖➖➖➖🔴➖➖➖➖➖➖ दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp समुहा मध्ये सहभागी व्हा -{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 📱 आवडल्यास नक्की शेअर करा 📱