USB लेखक - जितेंद्र दाते Image from wikipedia अजय भट्ट .... हे नाव टेक्नॉलॉजि विश्वात आभाळा इतक मोठं. १९९६ साली मी अमेरिकेंत फिलाडेल्फिया नामक शहरांत, लेक्टॉनिक रिसर्च लॅब- LRL म्हणुन कंपनीत कामानिमित्त गेलेलो असतांना, अजय भट्ट हे नाव पहिल्यांदा कानावर पडले. अर्थात नाव भारतीय असल्यामुळे जास्त आत्मीयता वाटली. कम्प्युटरला अतिशय सोप्या रीतीने बाकीचे उपकरण जोडता यावेत व हाय स्पीड डेटाची देवाण घेवाण करण्याचा दृष्टिने हा इसम इंटेल सारख्या जगविख्यात कंपनीत, एक मोठी क्रांती घडवत होता. माझ्या तत्कालिन कलीग व खास मित्र सॅम ऱ्हुबेन ने मला हें सांगितले. त्याकाळी इंटरनेट, गुगल, इमेल असलं फारसं कांही नव्हत. मी इंटेल कंपनींच्या फॅक्स लाईन वर सरळ एक फॅक्स केला. टू : अजय भट्ट फ्रॉम : जितेंद्र दाते . डिअर अजय सर , आय आम अँक्शसली लुकिंग फॉरवर्ड फॉर युअर रेव्होल्यूशनरी मॅजिकल USB डिव्हाईस .वन ओफ द...