◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©


कविता समूह क्र ७ चे संकलन  

    📚'मराठीचे शिलेदार' समूहाचे साहित्यिक व्यासपीठ📚

‼ 'मराठीचे शिलेदार कविता' समूहात काल देण्यात आलेल्या विषयावर निवडक सदस्यांनी केलेले 'कविता लेखन'.‼

♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾

       🙏विषय :- तुझं अस्तित्व🙏
       🎋दिनांक:- २७/जानेवारी/२०२१🎋

♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾

तुझं अस्तित्व

तुझं अस्तित्व माझ्यासाठी
अनमोल आहे हे 
आनंदी जीवनाच्या वाटेवर
सुखासवे मी चालू पाहे !!

लाख संकटे जरी आली
सोबतीने आपण मात करू
जगाच्या या बाजारामध्ये
प्रेमाची आपण देवघेव करू!!

भिती कुणाची मग ना उरे
आत्मविश्वासाने चालू
हासत खेळत जीवन सारे
आनंदाच्या गोष्टी बोलू !!

 ✍️सौ.सत्यभामा आदिनाथ वाघमारे(झेंडे)म्हसवड नं २ 
 कुकुडवाड ता माण जि सातारा 
 सदस्या मराठीचे शिलेदार  समूह.
♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾

Next poem


वेदना वेदना सहन करुनी
नऊ महिन्याचं केला गोळा
दर महिन्याच्या वेगळ्या कळा
आता सोसवेना भार तिला

जन्मा आली मुलगी झाली
बापाच्या कपाळी रेखा उमटली
कस करू मी आता लेक झाली
हुंडा लकेर समोर दिसू लागली

लेक चालू लागली,बोलू लागली
घरभर थाई थाई नाचू लागली
अनेक कला अंगात रचवू लागली
अस्तित्वाचे अक्षर गिरवू लागली

पाळी येण्यास सुरुवात झाली
लेक माझी बाईपणात आली
पण,घरी पाढा वेगळाच झाला
धाक,बंधने,ती आता पाळू लागली

सावित्री चरित्र वाचू लागली
हिमतीने उभी राहू लागली
मायबापाचा मिळते आधार
नराधमांना धडा शिकवू लागली

ऐक ना मुली,सांगणे माझे तुला
तुझं अस्तित्व तूच कर निर्माण
सैनिक रणांगणात उतरून
वाढव देशाची छान

वीरमाता,विरपत्नी यांना मान
तुझ्या सारखि लेक देशोमान
देशसीमेवर आलं मरण
तुलाच करू आम्ही सलाम


 मनीषा ब्राम्हणकर 
 अर्जुनी/मोरगाव,गोंदिया 
 मराठीचे शिलेदार समूह

♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾

 Next poem 

तुझं नि माझं
नातं खासमखास
सखा तू ह्रदयस्थ
आहेसच खास…..।।१।।

करगुंफणात ती
सुमंगल सप्तपदी 
साथ तुझी मधुर
लाभते पदोपदी…..।।२।।

सजलंय निढळी
इंदूबिंब रक्तवर्ण
शोभतो कंकणी
सौभाग्य हरीतवर्ण….।।३।।

शृंगार माझा तू
सौभाग्य मी तुझे
अभंग ,अवीट ते
नाते तुझे माझे…...।।४।।

श्वास माझा तुला
केव्हाच बहाल केला
क्षणांत जगण्याचा
आनंद सोहळा झाला….।।५।।

तुझं अस्तित्व
माझ्यात मिसळलेले
जन्मोजन्मीचे नाते
तुझेमाझे जुळलेले….।।६।।

 सौ. भारती भाईक, नागपूर. 
 सदस्या मराठीचे शिलेदार.

♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾

           🙏कविता संकलन/सहप्रशासक🙏
             ✏श्रीमती सुधा अश्वस्थामा मेश्राम
            ता. अर्जुनी /मोर, जि. गोंदिया
                  
 ©मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह

 मुख्य प्रकाशक व आयोजक 
राहुल पाटील, नागपूर 
मराठीचे शिलेदार समूह संपादक©

ब्लॉग संकलन
अर्जुन अप्पाराव जाधव
सदस्य मराठीचे शिलेदार समुह नांदेड ©

एक टिप :- आपण जर का कवी असाल तर खालील फोटो डाऊनलोड करा आणि व्हाट्सअप वर स्कॅन करून समूहात सहभागी व्हा आपल्यासाठी हक्काचे व्यासपीठ मराठीचे शिलेदार समूह 



तुमच्या कविता व लेख आमच्या ब्लॉग वर टाकण्यासाठी खालील नंबर वर पाठवावे किंवा क्यू आर कोड स्कॅन करावे



यशाचा मंञ ©

 



➖➖➖➖➖➖🔴➖➖➖➖➖➖

दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp समुहा मध्ये सहभागी व्हा

-{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-

📱आवडल्यास नक्की शेअर करा📱






टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

थोडं प्रेम स्वतः वरही... | Marathi Audio story | Audiobook

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

फक्त व्यक्त व्हायला शिका...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे