◾अभंग :- भेटी लागी जीवा लागलीसे आस
🌻 *आनंदी पहाट* 🌻 *मनाचिये वारी पंढरीची* *भक्ती मार्गाच्या वाटेवरची* *श्रीक्षेत्र देहूनगरीतून आज तुकोबांच्या पालखीचे प्रतिनिधिक प्रस्थान.* 🛕 🚩👣🚩 🚩👣🚩 🌹⚜️🚩🔆🙏🔆🚩⚜️🌹 *परमेश्वरी शक्तीवर ज्यांचा विश्वास आहे त्यांना हे नक्कीच पटते की केव्हा कसे वागावे याची सद्बुद्धी परमेश्वरच देतो.* *यंदा विठुरायाची इच्छा अशी की तुम्ही माझ्या भेटीसाठी येण्याची गरज नाही. त्यासाठीचे कष्ट तुम्ही उपासनेत खर्च करावेत. मानस पूजेने तुम्ही माझे चिंतन करा.* *मनाचे वैशिष्ट्य असे की तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करता, त्या गोष्टीचा जगभर प्रवास मन घडविते. जेव्हा हे मन विठ्ठलालापाशी स्थिरावते तेव्हाही याची अनुभुती प्राप्त होते.* *चांगल्या आठवणी या मनात सदैव आनंद.. उत्साह.. चैतन्य निर्माण करतात. मग आज डोळ्या समोर यावा पंढरीला निघालेला तो देहू नगरीतला जगदगुरुंचा पालखी प्रस्थानाचा देखणा सोहळा. ते शिस्तीतले शुभ्र वेषातील टोपी घाललेले वारकरी. फुलांनी सुशोभित पालखी.. तुकोबांच्य