🌹🌸🌴🌾🦋🌾🌴🌸🌹
जगात कितीही शोध लागले तरीही पोटाची भूक भागविण्यासाठी एकमेव पर्याय आहे तो शेतीचाच. लहरी निसर्गाशी झगडत आमचा बळीराजा काळ्या मातीतून सोने पिकवतो.
संपुर्ण शेतकरी कुटुंबच शेतात राबते. या कष्टातही ते आनंद शोधतात. अहोरात्र कष्ट करताना एकच स्वप्न उराशी बाळगतात की सारे काही हिरवेगार होऊन हे शिवार फुलू दे.
आपल्या धन्याविषयी.. त्याच्या कष्टाविषयी.. त्याच्या लक्ष्मीला प्रचंड आदर असतो. तो जेव्हा शेतात राबतो तेव्हा ती सुद्धा खांद्याला खांदा लावून मदत करते. त्याला साद घालते. जेव्हा कष्टाचे चीज होते.. शिवार फुलते तेव्हा धन्यामध्ये वाघाचे बळ येतं.
भरलेल्या मोटेप्रमाणे त्यांचे मन फुलते. तिचा.. त्याचा सूर.. ताल जमलाय. तिचा आनंद बघून तो पण खुष होतो. तो कष्ट उपसतो, तिला ठाऊक आहे त्याच्या घामातून मोती तयार होणार आहेत, कारण ही माती मायाळू आहे. दुपारी थोडा वेळ विश्रांतीला झाडाची सावली मिळू दे.. अर्थातच सर्वत्र वनराई बहरू दे हे मागणे.
शेतकरी कुटुंबाची ही सुखाची अपेक्षा.. ही ललकारी.. साद जगाच्या आनंदासाठी आहे. अपार कष्टातही आनंदाने जगणाऱ्या शेतकरी कुटुंबाच्या प्रेमभावना व्यक्त करणारे हे जगदीश खेबूडकर यांचे गाणे.
🌹🌸🌴🌾🦋🌾🌴🌸🌹
_राजा ललकारी अशी दे_
_हाक दिली साद मला दे_
_कुंकवाचा माझा धनी_
_बळ वाघाचं आलंया_
_भरलेल्या मोटंवानी_
_मन भरून गेलंया_
_ओढ फुलाला वाऱ्याची_
_तशी खूण इशाऱ्याची_
_माझ्या सजनाला कळू दे_
_हाक दिली साद मला दे_
_सूर भेटला सूराला_
_गानं आलं तालावर_
_खुळ्या आनंदाचं माझ्या_
_हसू तुझ्या गालावर_
_भरजरीचा हिरवा_
_शेला पांघरून नवा_
_शिवार हे सारं फुलू दे_
_थेंब नव्हं हे घामाचं_
_त्याचं बनतील मोती_
_घास देईल सुखाचा_
_लई मायाळू ही माती_
_न्याहारीच्या वखुताला_
_घडीभर ईसाव्याला_
_सावली ही संग मिळू दे_
🌹🎼🥀🌾🌴🌾🥀🎼🌹
*गीत : जगदीश खेबूडकर* ✍️
*संगीत : अनिल-अरुण* 🎹
*स्वर : अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर* 🎤
*चित्रपट : अरे संसार संसार (१९८१)* 📺
🌻🥀🌸🎼🌴🎼🌸🥀🌻
_____________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा