◾गीत :- देहाचे आवरण गळूणी गेले

          🌻 आनंदी पहाट 🌻
          आत्मसाक्षात्काराची
            🌸🚩🔆🌺🎶🌺🔆🚩🌸
       
        कोकणातील संतपरंपरेचे एक पवित्र स्थळ म्हणजे पावस. रत्नागिरी जवळचे हे ठिकाण पावन झालेय ते स्वामी स्वरुपानंदांच्या वास्तव्याने. खरं म्हणजे स्वामी स्वातंत्र्य सैनिक. स्वातंत्र्यासाठी येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगतानाच सोहम् साधनेकडे वळले. 
        हिरव्यागार निसर्ग कुशीत पावस येथे स्वामींचे समाधी मंदिर आहे. स्वामींनी देसाई कुटुंबियांकडे एकाच ठिकाणी ४० वर्षे राहून ज्ञानसाधना केली. अनेक ग्रंथ लिहले. ज्ञानेश्वर माऊलींचे भक्त. नित्य पठनासाठी ९००० ओवींची ज्ञानेश्वरी १०९ ओवीत लिहली. ज्ञानदेवांकडून स्वामी स्वरुपानंदांकडे आलेली सोहम साधना हा भक्तांसाठी सुलभ असा राजमार्गच. या योगींनी सुखी जीवनासाठी लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला.
        मनुष्याचा गर्भावस्थेत असलेला जीव "अहं ब्रह्मासी" मी ब्रह्म आहे हे जाणतो. पण जन्म होताच "कोहम् कोहम्" अर्थातच "मी कोण" हे विचारतो. मग सुरु होतो तो जीवन प्रवास. या प्रवासात अनेक सुखदुःखाचा सामना हा जीव करतो. जीवनात सगळे भोग हे जीव भोगतो. सुखाने हर्षभरीत होतो तर दुःखाने कोलमोडतो. मग प्रत्येकवेळी दुसऱ्यावर दोषारोपण करतो. पण आपल्या मूळ स्वरुपाची जाणीव नसल्यामुळे हे घडते. अशावेळी उद्धार करतात ते सदगुरु. ते मनुष्याला "अहं ब्रह्मासी" ची आठवण करुन देतात. मग जीवनात सद्विचार.. सकारात्मकता.. सद्भावना वाढीस लागते.
        काम.. क्रोध.. लोभ.. मोह.. मद.. मत्सर या विकारापासून मुक्त होता आले की सगळे जग आपले वाटते. चित्त शुद्ध होते. नशिबाला.. बाह्य परिस्थितीला दोष न देता आपले जीवन आपणच सुखी.. समाधानी आनंदी करु शकतो. या जगतात येण्याआधी हा जीव जसा शुद्ध होता तसे वागता येते. माऊली काय किंवा इतर सगळेच संत कधीही कुणावर दोषारोपण करत नाहीत.
        पण हे तेव्हाच घडते जेव्हा या देहावरचे सत्ता.. संपत्ती.. बुद्धी.. प्रतिष्ठा सगळेच अहंकार दूर होतात. मग मूळ स्वरुप कळते. त्या प्रचंड अशा ब्रह्मांड शक्तीचाच एक भाग आहोत जे ब्रह्मांड चिदानंद आहे. हा सोहम नाद जाणला की अंतरबाह्य शीतलता अर्थातच मनःशांती अनुभवास येते. गुरुकृपेने आत्मसाक्षात्कार होतो. विलक्षण अशा भगवंताच्या तेजाची अनुभुती स्वतःमध्ये जाणवते, आणि.. आणि या जीवन प्रवासाचे नेमके आनंदाचे गाव कोणते हे समोर दिसते.

🌹⚜️🌸🌴🛕🌴🌸⚜️🌹

  देहाचे आवरण गळूनिया गेले
  मोकळे आकाश झाले
  स्वरूपाचे गाव कळले

  भरुनी अवकाशी
  बाह्यांतर व्यापले
  कणाकणांतून उरले
  स्वरूपाचे रूप कळले

  सोहंम् सोहंम् नादातूनिया
  विश्व सारे डोलले
  स्वरूपाचे गान आता
  स्वरूपी कळले

  अंतर्बाह्य शीतल
  तेजाने उजळले
  सोहंम् सोहंम् गाता गाता
  रूप गावी ठाकले

🌹🎼🚩🔆🛕🔆🚩🎼🌹

गीत : मोहिनी नातू

संगीत : प्रसाद जोशी

स्वर : रेवती कामत

🌻🥀🌸🎼🌺🎼🌸🥀🌻
__________________________________________

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

फक्त व्यक्त व्हायला शिका...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट