◾कविता :- आईवडीलांचे उपकार
आईवडीलांचे उपकार
न करता येई फेड ऋणांची
आईवडीलांच्या उपकारांची
न मोजता येती उपकार
ते चांदण्यांपेक्षाही फार
न गरज मुलाविना कशाची
वेळ घालवू त्यांच्या सोबत
विचार करु त्यांच्याबाबत
दोन शब्द हवी त्यांना प्रेमाची
आवड ही पसंत करुनी
विचार त्यांचे मान्य करुनी
पाड वर्षा केंव्हातरी हर्षाची
त्या बोलण्याला मान देऊनी
मताचा त्या आदर करुनी
घे शोध मुखाच्या हर्षि तेजाची
रागवल्याने न रागवता
हसऱ्या मुखाने तु बोलता
ओळखून भाषा त्यांच्या प्रेमाची
लेकरा मिळावे खुप सुख
मातापित्या इतकीच भुक
पाहणी कर मनाची,हृदयाची
स्वछ मनातुनी,हृदयातुनी
देण थोडीशी त्यांच्याकडूनी
घे रे प्रेमाची प्रेमाची प्रेमाची
📜 रमा शिरशे
माझी दुसरी कविता | स्वप्न फुलवरा | रमा शिरशे | click here
_______________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा