◾कविता :- स्वप्नफुलवरा
स्वप्नफुलवरा
फुलात हा फुलवरा
मांडला कुणी सांग जरा
या मनगुलमोहरा
फुल हे पाकळ्यांचे
साधन प्रसन्नततेचे
सुगंधा दरवळण्याचे
गुणधर्म हे पुष्पाचे
नष्ट होई फणकारा
दृश्य पाकळीप्रकरा
जिवन सुखदुःखाचे
क्षणीच कोमेजण्याचे
मृदेत मिसळण्याचे
पुष्पासम गुण औषाचे
फुलला स्वप्नफुलवरा
या मनात भरभरा
कोमल पाकळ्यांविना
अर्थ न अमोल जिवना
भाव्याशा स्वप्नांविना
अमधुरसे जिवना
फुलेल औष सरसरा
फुलता स्वप्नफुलवरा
रमा शिरशे
____________________________________________
टिप : -{ कविता कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा