◾कविता :- कल्पतरू
'कल्पतरू'
आहे गं तुच गुरु,
माझी कल्पतरु,
छायेखाली तुझ्या
लता ज्ञानाची माझ्या बहरली,
तिमीरातुन अज्ञानाच्या,
जिंग्दगि ही सावरली,
मी तुला कसे विसरू ?
आहे गं तुच माझी गुरु,
माझी कल्पतरु,
आलीस बनून...
प्रत्येक वळणावर आयुष्याच्या
तारणहार तु माझी,
कशी गं ? भरु मी आता...
रिती ओंजळ तुझी,
लागलो मीच मला सावरु,
आहे गं तुच गुरु,
माझी कल्पतरु.
➖➖➖➖➖➖🔴➖➖➖➖➖➖
दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp समुहा मध्ये सहभागी व्हा
-{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
📱आवडल्यास नक्की शेअर करा📱
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा