◾कविता :- छोटसं एक गाव...
"छोटसं एक गाव.....
तुझं गं आई"
छोटसं एक गाव.....
तुझं गं आई,
नांदते तिथे,
वात्सल्याची तुझ्या गं नवलाई,
गंध तुझ्या प्रेमाचा.....
वाऱ्यासोबत गाई अंगाई,
नाही तिथे.....
दुरावा नात्यांचा,
वाहे 'झरा' तिथे,
फक्त माणुसकीचा,
आहे तुच साऱ्यांची उत्तराई,
छोटसं एक गाव......
तुझं गं आई,
नाही तिथे.....
विटा अन् मातीचे जंगलं,
तुझ्या मायेने,
सारं गावच आहे जागलं
सारी तुझीच पुण्याई,
➖➖➖➖➖➖🔴➖➖➖➖➖➖
दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp समुहा मध्ये सहभागी व्हा
-{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
📱आवडल्यास नक्की शेअर करा📱
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा