◾यशाचा मंञ :- एकटेपणा ....

🙇
 [एकटेपणा] 
Copy paste from FB source

'थिंक पॉझिटिव्ह' नावाचा एक दिवाळी अंक आज लायब्ररीत हाती आला.. आणि याची थीम आहे "एकटेपणा".  पूर्ण अंक याच विषयाला वाहिलेला आहे. 

या दिवाळी अंकातील "एकटेपणातून बाहेर येण्याचा रियाज!"  हा श्री.ऐश्वर्य पाटेकर यांचा लेख वाचनात आला. सदर लेखक हे पहिल्या युवा साहित्य अकादमी पुरस्कार चे मानकरी आहेत, आणि त्यांची 'भुईशास्त्र' आणि 'जू' ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.  त्यांच्या या लेखातील एक सुंदर भाग खाली देत आहे. 
*********
"मला आमच्या इथं गावातील बिया वाल्या बाईची गोष्ट आठवते. बिया वाली बाई. सतत बिया गोळा करत असायची. म्हणजे तेच तिचं आयुष्यभराचं काम होऊन गेलं होतं. जिथे बी खोचली तिथं झाड उभं राहायचं.  हा तिचा हात गुण होता की झाडा -कोडावरची माया? माहित नाही. 

मी तिला माझ्या लहान वयापासून पहात आलो. ती सारखी बिया गोळा करायची. तिने पेरलेल्या  बियांमधून किती झाडे उगवून आली, याची मोजदाद कशी करणार? अगणित झाडं.  ज्या झाडाकडे बोट दाखवलं ते झाड बियावाल्या बाईनेच लावलेलं असायचं.  म्हणजे तसं पाहायला गेलं तर उगवून आलेल्या एकूण एक झाडांवर तिची मालकी होती. पण तीने तशी कुठल्याच झाडावर मालकी सांगितली नाही. 

बियावाल्या बाईला मूलबाळ काही झालं नाही. त्याचेही तिला कधी काही वाटलं नाही.

 तिला एकदा आई म्हणाली होती,
"आत्याबाई, तुम्हाला मुलबाळ झाले असतं तर आता नातू -पणतू तुमच्या अंगाखांद्यावर खेळले असते!"

तेव्हा तीचे उत्तर होतं, "नाही झालं तेच बरं! नाहीतर ही झाडा-कोडाची पोर कुणी सांभाळली असती? " 

" कसा जन्म जावा ओ आत्याबाई तुमचा?"

तेव्हा ही बिया वाली बाई म्हणाली,  "जसा तुझा भाकरी थापत थापत जाणार तसा माझी झाडे लावता लावता! हा आता मला सांग तुझ्या भाकरी कुणी मोजल्या का? माझी झाडं मात्र मोजली जातात. तुला काय वाटलं मला मुलाची आस नव्हती? 
होती ग.. पार झुरणीला लागले होते. त्यावेळेला माझी आत्या आली मदतीला धावून. तिलाही मूलबाळ नव्हतं. तिने मला एक बी दिली.  म्हणाली, आपली कूस आपण नाही उजवू शकत मात्र मातीची तर उजवू शकतो ना...
दिलेली बी जेव्हा मी आळ्यात लावली तर चौथ्या-पाचव्या दिवशी मातीवर आलेला हिरवा पोपटी कोंब पाहून मी हरकले. जणू मीच बाळंत झाले. मग नादच लागला.. 
अन तसही, किती लेकरा बाळावाल्या आया बाया होत्या माझ्या भवतीच्या. पण आज त्या एकट्याच उरल्या. मी तरी माझ्या झाडांसोबत आहे. 
माझ्या या लेकरा बाळांना पाय नाहीत,  हे एका अर्थी बरंच झालं.! त्यामुळे ते मला एकटीला सोडून नाही जाऊ शकत. "
*********

खूप अंतर्मुख केलं बियावाल्या बाईंच्या या छोट्याश्या कथेने.   आयुष्यात आपण प्रत्येकाने कधीनकधी एकटेपणा अनुभवलेला आहे..  जागतिक आरोग्य संघटनेच्या एका ग्लोबल सर्व्हे नुसार 2020 सालपर्यंत एकटेपणा हा जगात तीव्र आणि सर्वदूर पसरलेला आजार  असेल, कारण हा आजार छुपा आहे, तो वरून दिसत जरी नसला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास तो नैराश्यकडे केव्हा घेऊन जातो हे कळतही नाही. 

आमच्या ओळखीत मोठ्या सरकारी हुद्द्यावरून रिटायर झालेले एक काका आहेत.  5-BHK चा भला मोठ्ठा सुसज्ज फ्लॅट, 3 गाड्या विथ ड्रायव्हर, घरात सर्व कामांना नोकर,  मुलगा आणि सून सॉफ्टवेअर इंजिनिअर, नातू नुकताच कॉलेजला जाऊ लागलेला, यांना स्वतःला कुठेही बाहेर जायला स्वतंत्र गाडी. पण प्रॉब्लेम फक्त एकच 'एकटेपणा'. घरात प्रत्येकजण बिझी. यांच्याशी बोलायलाच कुणी नाही. 

माझ्या जवळच्या मैत्रिणीची आई. स्वत:चा बंगला,  चांगल्या सरकारी संस्थेतून रिटायर, पैशाच्या नियोजनाची उत्तम समज, स्टॉक मार्केट मध्ये ऍक्टिव्ह, दोन्ही मुलं सुस्थितीत आणि परदेशात.  पण काही दिवसांपूर्वी एक छोट्याशा आजारपणानंतर त्यांचा कॉन्फिडन्स गेला, आणि आता 'एकटेपणा' च्या आजाराची शिकार आहेत. 

अशी कितीतरी लोकं आपल्याही पाहण्यात असतील.  कारण हल्ली  गृहिणी, शाळा कॉलेज मधील मुलांपासून, व्यावसायिक ते अगदी कॉर्पोरेट जगतातील  उच्चपदस्थांपर्यंत आजकाल कुणीही 'एकटेपणा' या आजाराला बळी पडू शकतं ही वस्तुस्थिती आहे.

वर उल्लेखलेल्या बियावाल्या बाईंना अशिक्षित, अडाणी कसं म्हणायचं?  एकटेपणाच्या जाळ्यात सापडू नये यासाठी 3 सूत्र नकळत आपल्या वागण्यातून देऊन जातात त्या...

पाहिलं सूत्र म्हणजे, "आपल्यातील पॅशन ओळखा, त्यात व्यस्त रहा",  

दुसरं, "आपलं दुःख कुरवळणं थांबवून, जे आहे त्यातही माझ्या दृष्टीने कसं चांगलंच होतंय असा दृष्टिकोन ठेवा"

आणि तिसरं, खूप महत्वाचे सूत्र म्हणजे, "आपण लावलेल्या झाडांवर कधीही आपली मालकी सांगू नका,  थोडक्यात, detach राहायला शिका, दुसऱ्यांसाठी काही करण्याची सेवावृत्ती अंगी असू द्या.".

➖➖➖➖➖➖🔴➖➖➖➖➖➖

दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp समुहा मध्ये सहभागी व्हा

-{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-

📱आवडल्यास नक्की शेअर करा📱

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

कविता : महात्मा गांधी

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...