'श्रीमंती' संजय धनगव्हाळ ****************** श्रीमंत व्हावस कोणाला वाटत नाही,प्रत्येकजण श्रीमंत होण्याचे स्वप्न पहात असतो,पण सर्वांनाच श्रीमंती मिळते असे नाही.काही वडिलोपार्जित श्रीमंतीचा वारसा चालवत असतात तर काही कष्ट,मेहनतीने श्रीमंती मिळवत असतात.तर काही प्रयत्नाशी परमेश्वर अस म्हणून श्रीमंत होण्याचे स्वप्न पहात असतात. आता श्रीमंत अधीक श्रीमंत झाला तर त्याचे काही वाटतं नाही,पण एखादी कष्टाने श्रीमंत झाला असेल तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो.श्रीमंत आणि गरीब या आयुष्याच्या दोन बाजु आहेत. त्याप्रमाणे माणूस जगतं असतो,गरजेपुरता पैसा असला तरी खुप झालं. म्हणजे आहे त्यात समाधान माणून सुखासुखीनी जगणारेही ते त्यांच्या पुरते श्रीमंत असतात आणि श्रीमंतीच्या श्रीमंतीत लोळण घेणारेही श्रीमंतच असतात. दोघांच्याही श्रीमंतीत तफावत असली तरी समाधानाने जगण्यात खरी श्रीमंती असते.दोघांची दिनचर्या वेग वेगळी,दोघांचे जगणेही वेगळे असते.पण श्रीमंताच्या चेहऱ्यावर श्रीमंत असण्याचा लवलेश असतो,तर श्रीमंत नणाऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव असतो.पण पैसा असतो तरच त्याला श्रीमंत म्हणायचं का ? सम...