◾विशेष लेख :- आयुष्य म्हणजे काय | free marathi audiobook blog

'आयुष्य म्हणजे काय'
✍संजय धनगव्हाळ 
******************
आयुष्य म्हणजे काय?
हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे,हा प्रश्न  प्रत्येकालाच पडतो,प्रश्न जरा गुंतागुंतीचा असला तरी तो सहज कोणालाही सोडवता येत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर,आयुष्य म्हणजे एक कोडं आसते हे कोडं ज्याला सोडवता आले तोच खऱ्यार्थाने आयुष्य जगला समजा. आयुष्यासारख्या गुंतागुंतीच्या जाळ्यातुन सहज बाहेर पडणे एव्हढे सहज सोपे नाही.खुप अडचणींना सामोरे जावे लागते.आता आयुष्य म्हटल्यावर अडचणी असणारच आहे. अडचणीशिवाय किंवा गुंतागुंती शिवाय माणसाच आयुष्य नसतेचं.आणि आयुष्य जगायच म्हटलं तर खुपं संघर्ष करावा लागतो. आणि संघर्ष नाही केला तर त्याला आयुष्यही म्हणता येणार नाही. कारण संघर्षातुन माणूस घडत असतो, संघर्षातुन माणूस कळतो संघर्ष असेल तरच जगण्याला अर्थ आहे.संघर्ष केल्याशिवाय कोण आपला कोण परका कळत नाही.संघर्षाचे चटके घेतल्याशिवाय कोण किती आपल्या जवळ आहे ते ही कळत नाही म्हणून आयुष्य जगायचं असेल तर संघर्ष हवाच.म्हणूनच आयुष्य म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडतोचं.
    आयुष्य म्हणजे जळणाऱ्या दिव्यासारखे असते,म्हणजे दिव्यात तेल असेपर्यंत दिवा उजेड देतो,उजेडाच महत्त्व असेपर्यंत माणूस जवळचा वाटतो जेव्हा त्या दिव्यातल तेल संपून उजेड मंदावतो तेव्हा आपली वाटणारी माणस आपोआप दुर व्हायला लागतात,आणि दिव्यासारखा उजेड देणारी माणस खुप साधीसुधी असतात. त्याला कल्पनाही नसते की आपल्यासोबत असणाऱ्या माणसाच्या मनात काय चाललय. कारण दुसऱ्याला उजेडात आणणारी माणस स्वतःकधीच उजेडात येत नाही प्रकाश देणारी माणस नेहमी अंधारातच असतात. अशा माणसांच कितीही महत्व असल तरी त्यांच्या कर्तृत्वाला फारस कोणी सलाम नाही.त्यांच्या स्वभावाचा,चांगलं वागण्याचा गैरफायदाच घेतला जातो आपलं मतलब साध्य करून घेतल्या नंतर जसे दिव्यातले तेल संपून अंधार होतो अर्थात चांगल्या माणसाची गरज संपल्यावर पुन्हा हाती काही लागनार नाही अशावेळेस आपला वटणारा,सोबत राहणारा माणूस आपसूकच दुर होतो.तेव्हा प्रश्न पडतो आयुष्य म्हणजे काय?
  आयुष्यात जर चुकीची माणस आलीत आणि अशा माणसांकडून नकोते अनुभव मिळत असतील तर आयुष्य कस जगावं हा प्रश्न पडतोचं,खुप कठीण असते आयुष्य जगणे.माणसाने माणसाला समजून घेणारी माणस या जगात आता आहेत तरी कुठे आणि असतील तर किती..? 
प्रत्येकजन आपआपल्या परिस्थितीने जगतो,प्रत्येकाला एकसुरी आयुष्य हवे असते,कोणाचीही अडचण नको की अडथळा नको,आपण आणि आपल आयुष्य याच चौकटीत त्याच जगण असते,आशा माणसांना कोणाशी काही देणेघेणे नसते आणि अशी माणसे आपल्या अवतीभवती खुप असतात.सभ्यतेचा देखावा दाखवून केव्हा काय घात करुन जातील कोणालाही कळत नाही.आयुष्यात सुख समाधान हवे असेल तर सर्वांना सोबत घेवून रहावे लागते सर्व सोबत असल्यावरच आयुष्य जगण्यात आनंद असतो.पण असं क्वचितच घडते.म्हणून जर्मन कवि गटे म्हणतात.आयुष्य म्हणजे  जीवन आणि मरण यांना जोडणारा सेतु अर्थात पुलं आहे.त्या पुलाच्या पलिकडे म्हणजेच आयुष्याच्या या तिरावरून पलिकडे जायला किती यातना भोगाव्या लागतात. हे देवच जाने.म्हणून म्हटले आहे की आयुष्य हे रंगमंचा सारखे असते या रंगमंचावर विविध पात्र अभिनित करून या जगात आपली ओळख प्रस्थापित करायची असते.कारण जन्माला येणाऱ्याला माणसाला माहीत नसते की आपल आयुष्य कसे असेल माणसाच्या आयुष्यात कोण कशा माणसाचा प्रवेश होईल याच स्पष्टीकरण कोणालाही देता येत नाही.प्रत्येकाला आनंदी आयुष्य जगायच असतं पण कायअसतं कधी कधी आपल्याच सोबत रहाणारी,आपली वाटणारी माणस केव्हा परकी होतील याची जराही भनक लागु देत नाहीत.आणि मग जेव्हा कळते तेव्हा खुप वेळ निघुन गेलेली असते.आयुष्य म्हटलं म्हणजे या जगात दोन प्रकारची माणस आहेत चांगली वाईट.कोणी कोणासोबत रहायच  आणि कोणासोबत नाही हा ज्याचा त्याच प्रश्न असतो.तेव्हा या आयुष्याच्या रंगमंचावर अनेक पात्र साकारायची असतात,जिथे नायक असणार आहे,तिथे खलनायक असतोच आशा माणसांनी कसं वागायच हे त्या माणसाच्या वागण्यावर अवलंबून असते. कारण सभ्यतेचा बुरखा घालून आपला घात करणारे आपल्या पाठीमागेच उभे असतात.तेव्हा आयुष्य म्हणजे काय असा प्रश्न पडु नये अस वाटत असेल तर आपल्या हातून कसलीच चुकं व्हायला नको.मला काही होणार नाही या अविर्भावत न रहाता माझ्या मुळे कोणाला काहीच व्हायला नको ही सहानुभूती ज्याच्या जवळ असते त्याला आयुष्य म्हणजे काय प्रश्न कधीचं पडत नाही.
  आयुष्यात अनेक प्रसंग येत असतात बऱ्यावाईट अनुभवातून मार्ग काढायचा असतो.तेव्हा आपल्या हातून काहीच चुक व्हायला नको किंवा आपल्यामुळे कोणाचं नुकसानही होणार नाही याची खुप काळजी घेतली पाहीजे.आपण काय करतो कसे वागतो,कसे बोलतो याकडे कुणाचतरी लक्ष असतेचं.माणसांच्या गर्दीतुन एक नजर. आपल्याकडे पहात असते तेव्हा आपल्याकडुन कोणाचा विश्वास घात होणार नाही कोणाचे मन दुखवणार नाही याची खबरदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.काय असतं आपल्या एका चुकीमुळे कुणाच मन दुखवणार असेल किंबहूना कुणाच्या भावना दुखावल्या जाणार असतील तर ते फारच वाईट असते.कुणाचा आत्मा दुखावला म्हणजे त्या तळतळत्या आत्म्याचा शाप माणसाला जगुही देत नाही आणि मरूही देत नाही.एक भल्या माणसाला फसवून त्याला दुख देवून त्याचा छळ होत असेल तर ही आयुष्यातली फार मोठी चुक समजायची कुणाचा विश्वासघातही केला गेला तरी त्या विश्वासघाच्या चक्रव्यूहात फसलेल्या माणसाला आजतागायत बाहेर पडता आले नाही,एकदाचा तो त्यात फसला की तो तिथेत मरतो.तेव्हा चांगल आयुष्य जगायच असेल तर जीवनात जेव्हढ चांगल करता येईल तेव्हढ चांगल करत रहायचं आपल्यमुळे कोणाच्या डोळ्यात. आसु नाही तर हसु यायला पाहीजे.करण रडणाऱ्या माणसाला हसवणे कठीन जरी असले तरी त्याच्या ईतके पुण्य दुसरे नाहीच आणि असे भाग्य फार कमी लोकांच्या वाटेला येते.
  आयुष्य फार सुदंर आहे.आणि आयुष्य उमलणाऱ्या  निरागस फुलासारख जगलं पाहीजे. असे आयुष्य जगण्याचा सुगंध सर्वत्र दरवळत असतो. म्हणून आयुष्य स्वच्छंदी जगायचं मस्त जगायचं, मनमोकळेपणाने जगायचं कुठलाही किंतुपरंतू  न ठेवता स्वच्छ हेतूने  जगणाऱ्या माणसाच्या आयुष्य कुठलाच गैरसमज  नसतो .तेव्हा शक्य तितके चांगल करत रहायचे. जगताना प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा. हसत खेळत जगणाऱ्या माणसाच्या आयुष्यात कधीच नैराश्य येत नाही.कारण तुमच एक छोटस हसु माणसाला जगण्यासाठी हजार हत्तीच्या बळ दते.आणि आयुष्य जगताना कुठलेही हेवेदावे नकोत.तुझ माझ करून अनेक माणस दुरावले गेल्याची उदाहरण देता येतीलं आपल्यात एकोपा असला की माणसाला आधार शोधण्याची गरज पडत नाही.आणि आयुष्य जसं आहे तस जगा परिस्थिती कशी आहे याचा विचार नकरता आपल्याकडे काय आहे याचा विचार करून आहे त्यात आनंद शोधण्यात समाधान समजायचे.आपण कुठेतरी कमी पडतो हा न्युनगंड मनात आणून  एक सुंदर आयुष्य संपवण्यात कुठलाच पुरुषार्थ नाही.आहे त्यात समाधान मानून जगल पाहीजे.
     आयुष्य म्हटले म्हणजे सुख दुख असणारच आहे.तेव्हा आपले नातीगोती सांभाळून जगण्यात जो आनंद आहे तसा आनंद इतरत्र कुठेच नाही.
आयुष्य म्हणजे तिन तासाचा खेळ आहे  जगण्याचा पडदा वर झाला की आयुष्य सुरू होते पडदा पडला की आयुष्य संपते. या खेळात कोण कितीदा हारेल कोण किती जिंकेल काही सांगता येत नाही तेव्हा आपण हारलो हा विचारही डोक्यात येवू द्मायचा नाही.कारण आयुष्यची सुरवात रोज नव्याने सुरू होते तेव्हा जिथे थांबलात तेथुन पुन्हा जगलात तर आयुष्य म्हणजे काय हा प्रश्नच पडणार नाही.           आयुष्यात सुख दुख ही येणारच आहे प्रत्येकाचा सामना करून एक साफसुतर नवं कोरकरीत आयुष्य म्हणजे सुखाचं नंदनवन.आयुष्य हि एक स्पर्धा आहे आणि या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला कमी वेळेत मोठ व्हायच आहे पण सर्वांना काही लवकर मोठं होणे शक्य नसते.तेव्हा आपल कुटुंब आपला परिवार हेच प्रत्येक माणसाच्या आयुष्यातलं मोठ विश्व असतं हे.विश्व जरी निट सांभाळता आले तरी आयुष्याच सोनं होतं कारण आपल कुटुंब आपल्याला जगण्याची उर्जा देवून एक चांगल आयुष्य जगायला शिकवते कारण आयुष्य खरच सुदंर आहे धन दौलत संपत्ती कोणी कोणाला देत नाही.किंवा कोणी घेवून जात नाही.कितीही कमवले तरी एक दिवस सारकाही सोडून रिकाम्या हाताने आयुष्याचा अंत होतो तेव्हा माणसाच्या कर्तृत्वाचा शेवट होवू नये यासाठी माणसाने माणसाशी माणसासारखे वागुन माणुसकी जपण्याचा पर्यंत करायचा.माणसाच्या आयुष्यात कोणत्यावेळी काय उलथापालथ होईल काही सांगता येत नाही तेव्हा प्रसंग सुखाचा असो अथवा दुखाचा कोणी हाक दिली की लगेच होकार देवून त्याच्या मदतीला धावून जाण्यात खुप मोठेपणा आहे. कोणी मदतीचा हात दिला तर त्याला साथ द्या मग बघा कोणालाच प्रश्न पडणार नाही
आयुष्य म्हणजे काय!

संजय धनगव्हाळ
९४२२८९२६१८
➖➖➖➖◾➖➖➖➖➖◾➖➖➖➖

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट