माणसं का बदलतात...

'माणस का बदलतात'
(संजय धनगव्हाळ)
*********************
असं म्हणतात की पैसा आल्यावर माणस् बदलता,माणसाची माणसीकता बदलते तेव्हा माणूस माणसाशी माणसासारखा वागतं नाही.म्हणजे जेव्हा एखाद्या माणसाची हलाखीची परिस्थिती असते तेव्हा तो कष्टाने मेहनतीने,किंवा आणखी काही ईतरमार्गाने श्रीमंत होतो त्याच्या जवळ पैसा येतो,त्याची परिस्थिती सुधारते सर्व सुखसोयी त्याच्याकडे असतात त्यावेळी आपसूकच त्याचे विचार बदलतात,त्याची माणसीकता,त्याचा दृष्टीकोन बदलतो तो त्याची हालाखीची परिस्थिती विसरून  दुसऱ्यांना कमी लेखतो.वाईटातून चांगल्या परिस्थितीत बदल झल्यावर फारच कमी लोकांना आपल्या हालाकीच्या परिस्थितीची जाणीव असते.आशी  माणस् आपला वाईट काळ कधीच विसरत नाही.कधीच त्याना गर्व येत नाही किंवा कधीही कोणालाही कमी लेखत नाही.उलट ते सर्वांशी नम्रतेने वागतील व अपल्या हालाखीच्या परिस्थितीत न घाबरता प्रामाणिक राहुन आपल्या कष्टावर विश्वास ठेवून सुखाच्या दिवसाची वाट बघायची दिवस बदलतातच अशा प्रकारे मार्गदर्शन करून समोरच्याचा उत्साह वाढवतील.पण हे अस सर्वांना जमत नाही.पैसा आल्यावर काहींच्या अंगात अहंमपणा एवढा ठासुन भरला जातो की.ते कोणाच्याही सावलीत उभे ऱ्हात नाही.कोणाला जवळही करणार नाही.अर्थात अशा माणसामधे आपलेपणाची भावना नसते.मग अशी माणस ओळखीची असो आपल्या अवतीभवती  आसो किंवा आपल्या कुटुंबातील असो.पैसा आला की माणूस बदलतोच हे सत्य आहे.
        आपल्याच घरातला विषय घ्यायचा म्हटला तर आपल्या कुटुंबातही आसा भेदभाव दिसुन येतो.लहानपणी एकमेकांसोबत राहणारी भावंड कालांतराने त्याच्या वागण्यात बोलण्यात स्वभावात बदल जाणवतोच.कुठेना कुठे मनात कटूता निर्माण होतेच पैसा असल्याचा गर्विष्ठपणा येतो त्यावेळी आपलीच माणस आपोआप आपल्या पासून दूरावतात त्यांच्यातला आपलेपणा नाहीसा होतो.याला कारण पैसा किंवा दुःखातून सुखात आल्यानंतर बदललेली माणसीकता.जगात गर्भश्रीमंत माणसही खूप आहेत.श्रीमंत असुनही ते जमीनीवरच असतात. उदारमतवादी व दुसऱ्याला आपलसकरून मदत करण्याची भावना त्यांच्या संस्कारातच असते.त्यांची माणसीकता कधीच बदलणार नाही.पण काहींची कधीनव्हे अचानक परिस्थिती बदलते थोडाफार पैसा येतो,आणि मग तो त्याच्या तोऱ्यातच वावरतो.तिन भावंड असतात त्यापैकी दोघांना काहीच परिश्रम न करता कमी वेळात नौकरी लागते आणि हळूहळू सर्व सुखसुविधा त्यांच्याजवळ येवू लागते पैसा,गाडी बंगला सार काही मौजेत असतं पण  त्यांचाच एक भाऊ समजा मोठा भाऊ याच्या वाटेला हालअपेष्टा असतात खूप कष्ट मेहनत करूनही कमी मिळकतीतच काम करावं लागतं आणि आहेत्या परिस्थितीत जगत असतो.दोन भाऊ श्रीमंत आणि एक भाऊ सर्वसाधारण असताना अशावेळी ईतर कोणीही त्याच्या परिस्थितीला हात भार लावणार नाहीत.
         एक प्रसंग सांगावसा वाटतो  की, शासकीय सेवेत मोठ्या पदावर कार्यरत असलेले वामनराव यांना तिन मुलं मोठा अजय नंतर मग विजय आणि महेश.आता दोघ मुलांपैक्षा मोठा मुलगा अजय खूप मेहनती कष्टाळू परिस्थितीची जाणीव ठेवून आहेत्यात समाधानी असणारा कसलीच हौसमौज नाही खूपच प्रामाणीक.पण जेव्हा त्याला शासकीय नोकरचा कॉल यायचा मुलाखती व्हायच्या त्यानंतर   डोनेशनची देण्याची मागणी व्हायची तेव्हा वामनरावांचा नकार असायचा. यामुळे अजयला अशा बऱ्याच शासकीय नौकरीवर पाणी सोडून एका कंपनीत अल्पशा पगाराव काम कराव लागत होत. पण विजय महेशच्या बाबतीत वामनरावांनी अस काही केले नाही त्या दोघांनाही पैसे भरून नौकरीला लावले.आता आईबाबांनी आपल्याशीच का अस वागाव याचा उलगडा काही होत नव्हता. सर्वांची लग्न झालीत मुलं झाली तेही मोठे झालेत विजय आणि महेश सरकारी नोकरदार असल्यामुळे त्याची परिस्थिती बदलत गेली पैसा आला पण खाजगी नौकरी असल्यामुळे अजय आहेत्याच परिस्थितीत स्थिरस्थावर होता. 
      पुण्यात नौकरीला असताना घर घेवून देण्याची विनंती केली तर तेव्हाही नकार आणि नसागंता वामानरावानी  महेशला मुबंईत घर घेवून दिले तर राहते घर विजयच्या नवावर केले अजयला मात्र काहीच नाही.आता विजय महेश श्रीमंतीच्या तोऱ्यात असताना आपला मोठाभाऊ प्रतिकूल परिस्थितीत आहे याच सोयरसुतक कोणालच नव्हते.विजय महेश आपल्याच तोऱ्यात होते त्यांच्यासह त्यांच्या बायका मुलांनाही पैशाची गुर्मी चढलेली होती तर अजय अपल्या परिस्थितीवर मात करून प्रगतिच्या दिशेने एक एक पाऊल टाकत होता याची जाणीव त्याच्या मुलालाही होती.
सांगायच तात्पर्य एव्हढचं की परिस्थिती उनसावली सारखी असते एका रात्रीतून काहीही  होवू शकते.दिवस कोणाचे बसुन ऱ्हात नाही दिवस बदलतात त्याप्रमाणे परिस्थितीही सुधारते आपल्याही वाटेला सुखासुखी दिवस येणार आहेत याची कल्पना अजयला होती म्हणून तो कधीच पैशासाठी जगला नाही.आहेत्यात तो खुश होता अडचणी खुप यायचा पण कोणाकडे त्यानू हात पुढे केला नाही.ज्याच्या अंगी मोठेपण त्यासी यातना कठीण या अनुभवातून  अजय आयुष्याचा आनंद घेत होता. कालांतराने मग अजयचाही मुलगा  नौकरीला लागलानी आजयची परिस्थितीत आपसूकच श्रीमंती येत गेली.पण कस असतं आपले रक्ताचे नातेसंबंधी असतानाही अस व्हाव हे अतिशय चुकीचे आहे.
      ज्याच्याकडे पैसा नाही पण तो सर्वांना आपल समजून वागतो सगळ्यांना जीव लावतो कारण तोही त्याच कुटुंबातील एक भाग असतो पण परिस्थितीमळे दुरावला जातो म्हणनकाय त्याला परक समजायचं का?का त्याच्याशी परक्यासारख वागायचं.जे आपण रक्ताचे म्हणतो त्यांच्यासाठी खूपकाही करूनही त्याला शुन्य किंमत असते. आपल्याकडे पेसा असता तर आपल्यासोबत अस कोणी वागल नसतं अस साहजीकच मनात येतं.ही आपलीच माणसं आहेत का यांना काही भावना नाहीत का?
असाही प्रश्न डोक्यात घोळत असतो.त्यावेळी असही वाटतं की पैसा आल्यामुळे ही माणस जर दगडी काळजाची झाले असतील तर
या पैशावाल्यांना का म्हणून आपल समजावं 
दगडी काळीज असलेल्या माणसांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्याच काळजावर दगड ठेवून आशा माणसांपासून दुर राहीलेलचं बरं.
     माणुसकी पेक्षा पैसा मोठा नाही आपण श्रीमंत आहोत पण संबधीत व्यक्ती ही आपलीच आहे याच भान ठेवून त्यावेळी त्याला मदत करणे किंवा त्याच्या अडचणी सोडवणे हिच खरी त्याच्यातल्या माणूसकीची किंवा संस्कारांची श्रीमंती असते.पण असा मोठेपणा फार कमी लोकांच्या आंगी असतो.पैसा गरजेचा आहे पण पैशाचा माज अंगवळणी पडायला नको. पौशामुळेच माणस दुरावतात पैशामुळे कुटुंबाच विभाजन होत,पैशामुळेच माणसाची माणसीकता बदलते.पैशामुळेच नाते संबध तुटतात, माणसाच्या वागण्याचा बघण्याचा द्रुष्टीकोन बदलतो.आणि आपल्याच माणसांपासून दुरावतो.म्हणून पैसा आला तरी आपली हालाकीची परिस्थिती न विसरता सर्वांना सोबत घेवून आपल्या श्रीमंत जगात आपुलकीने जवळ करून माणूसकीने वगाण्यात जो आपलेपणा आहे तो कशात नसतो.माणसाने पैसा कमवावा श्रीमंत व्हाव.पण पाय जमीवरच असुद्यावेत.कोणाला कमीलेखू नका.किंवा पैशाचा माज आणू नका गर्विष्ठासारखे वागु नका.कोणीका असेना  आपला,परका,जवळचा, दुरचा,आपल्या अवतिभोवती असणारा कोणाच्याही परिस्थितीवर हसु का वाईट काळाची निंदाही करू नका आपल्या सुखाचा एक क्षण त्याच दुःख दुर करू शकतो तेव्हा माणूस कीतीही श्रीमंत असला तरी दुसऱ्याला मदत करून सहानभूतीचा हात पाठीवर ठेवून  आपल्याच माणसाचे अश्रू पुसायला आपला एक श्रीमंत हात जरी पुढे केला तरी ते माणूसकीला शोभणारे असेल.तेव्हा माणसाजवळ कितीही  पैसा असला तरी माणसाने माणुसकी न सोडता,माणसाने माणसाशी माणुसकीच वागायला हवं हिच करी सर्वश्रेष्ठ श्रीमंती.

संजय धनगव्हाळ
९४२२८९२६१८

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा



या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

निसर्ग किमया कि देवता ... Mother Nature

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...