◾लघु कथा :- खेळ नशिबाचा

कधी कधी आपण आयुष्याविषयी बोलत असताना किती सहजतेने बोलून टाकतो की आयुष्य किती सोपे आहे पण एखाद्याच्या आयुष्यात काय लिहिलेलं असतं हे कुणाला ठाऊक नसतं आणि तसेच एखाद्याच्या आयुष्यात किती सुखदुःखे लिहिलेली आहेत याची आपल्याला कधी कल्पना सुद्धा नसते.   आठवण  ही जीवनातील जणू एक दुर्लभ अशी गोष्ट आहे ज्यामुळेे कधीकधी आपण त्यांना आठवून खूप हसतो सुद्धा आणि कधी त्यांना आठवून आपल्याला खूप रडायला सुद्धा येते.
आज मी सुद्धा ज्या आठवणी तुम्हाला सांगणार आहे त्या जरी माझ्या जीवनात निगडित नसल्या तरी पण आजही मला त्या आठवणी मुळे फार दुःख होतं आणि त्यांना आठवलं की रडायला येतो की एखाद्याच्या आयुष्यात इतकं दुःख का बर येत असेल?
आज त्याला जाऊन तेरा वर्षे झाली पण आजही त्या घटनांना आठवून वेदिका स्वतःला दोष देत असते की मी जर त्या दिवशी त्याच्यासोबत गेले असते  तर आज तो जिवंत राहिला असता.
      आज माझ्या मित्राकडे त्याच्या  घरी सगळे आनंदात होते कारण उद्या लग्न होणार होता त्याच्या बहिणीचा. त्याच्याकडे एक मंगल कार्य होणार होते त्यांच्या दोन आत्म्याचा मीलन होणार होता आणि लग्न म्हटलं तर एक मोठा उत्सव होणार होता सगळं कसं व्यवस्थित सुरू होतं लग्नाची तारीख जशी जवळ यायची  तशी घरचे कामे पण बाकी होती आणि तेवढ्यात, आम्हाला एक तार आली. ज्या मुलाबरोबर वेदिकेच लग्न होणार होते त्या मुलाचा अपघात झाला होता आणि तो त्या ठिकाणी जागीच ठार झाला होता. हे ऐकून सर्वांना धक्काच बसला. आणि वेदिका खूप वेदनेने रडायला लागली. घरी असणारे सर्व जण काही क्षणाकरिता स्तब्धचं झालेत. 
त्या दिवशी वेदिका कुणासोबतही बोलली नव्हती. पण तिचे दुःख सर्व लोक समजत होते. आई बाबा व आजी तिला धीर देऊन समजावन्याचा प्रयत्न करीत होते.
तरी वेदिका काहीच बोलत नव्हती. तिला यापुढे खूप लोकांच्या चुकीच्या भावनांना सामोरे जावे लागणार होते. वेदिका आणि संजय हे दोन्ही सोबतच इंजिनिअरच्या वर्गाला शिकत होते. फार चांगले मित्र होते व ते एक दुसऱ्या ला पसंत करत होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर संजय ला पुण्यात एका आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. नंतर दोघांच्या परवानगीने त्यांचं लग्न जमलं होतं आणि ते दोघेही फार खुश होते. 
संजय आपल्या लग्नाच्या पत्रिका स्वतः वाटत होता. आणि पत्रिका वाटून परत येतांना त्याचा एका ट्रक शी त्याच्या बाईक सोबत अपघात झाला होता.
या दुःखातून वेदिकेला सावरायला खूप वर्षे लागली. हळूहळू आई बाबानी  तिला समजावल की बाळ आता आम्ही तुझा दुसऱ्या मुलाशी लग्न करून देतो. पण वेदिका तयार होत नव्हती म्हणून तिला नोकरी करण्याचा सल्ला दिला. की तू कामात व्यस्त राहशील तर तुझं मन लागेल. शिकलेली मुलगी होती ती तयार झाली आणि तिला तिच्या संजय ज्या कंपनीत काम करीत होता त्याच ठिकाणी तिला ही नोकरी मिळाली. 
हळूहळू दिवस सरकत गेले व संजय च्या आठवणी पुसट होत गेल्या. दोन तीन वर्षांनी बाबांनी तिला पुन्हा लग्न करायला बोलले तेव्हा तिने होकार दिला. त्याच कंपनीत तिच्या सोबत काम करणारा एक इंजिनिअर मुलगा तिला आवडायला लागला होता त्याच्याबद्दल वेदिका ने बाबांना सांगितलं. बाबांनी विचार केला की मुलगी आपल्या आयुष्यात खूश राहिली पाहिजे असे त्यांचे विचार, म्हणून त्यांनी वेदीकाचे लग्न पुण्यातच लावून दिले.
    सुखा समाधानान वेदिका व वीरेंद्र आपले आयुष्य जगत होते. दोन वर्षात त्यांनी पुण्याला घर विकत घेतला आणि त्यांना एक गोंडस मुलगा सुद्धा झाला. वेदिकाचा परिवार सुखात नांदत होता. दोघेही नोकरी करून कमवत होते पैशाची चणचण नव्हती. मुलगा मोठा झाला होता तो शाळेत जाऊ लागला होता. 
एक दिवस अचानक वीरेंद्र ची प्रकृती बिघडली. त्याला घेऊन वेदिका डॉक्टर कडे गेली. तपासणी केल्यावर डॉक्टर ने सांगितले की वीरेंद्र ला डोक्याचा कँसर आहे आणि तो फक्त दोन तीन महिनेच जगणार.  पुन्हा वेदिकेच्या डोक्यावर खूप मोठा डोंगर कोसळल्यासारखं झालं. वीरेंद्र चा चांगल्यात चांगल्या दवाखान्यात वेदिका उपचार करत होती. विरेंद्र च्या उपचारासाठी तिच्या जवळ असलेला पैसा संपलेला होता. बाबांना सांगून गावाकडची जमीन विकून तो ही पैसा वीरेंद्र च्या उपचारासाठी लावला पण तो एक दिवस वेदिकेला सोळून नेहमी साठी फार दूर निघून गेला होता.
पुन्हा वेदिकेच्या नशिबी दुःख आले होते व उरले सुरले पैसे ही सर्व खर्च झाले होते. वेदिका आपल्या मुलाला घेऊन खुप रडायची.
 वेदिका आता जीव गमवावा असे अनेक वेळा विचार करत होती. जगण्यात तिचे काहीच रस नव्हते पण मुलगा होता त्याकडे पाहून स्वतः सावरण्याचा प्रयत्न करीत होती. पण देवाला का मंजूर होते.  की तिच्या नशिबात फक्त दुःख चं भोगण्याचे होते. एक दिवस मुलगा शाळेतून घरी येत असतांना त्याच्या शाळेच्या बस चे अपघात झाले. व त्या दिवशी त्या बस मधले वीस मुलं देवास मुकली व त्यात एक वेदिकेचा मुलगा होता. तिच्या जीवनातला शेवटचा दिवा तो ही विझला होता. वेदिकेच्या दुःखाचा विचार न केलेला बरा. त्या वेळी वेदिका दोन महिने कोमात राहिली. डॉक्टरांच्या खुप प्रयत्नानंतर आज वेदिका जिवंत तर आहे. पण फक्त तिचे शरीर...
कधी विचार करावा लागतो की देव सुध्दा किती कठोर आहे. वेदिकेने कोणते पाप केले असेल? तिला तिच्या जीवनात एका नंतर एक दुःखाचे डोंगर कोसळत होते.
–-------------------------------
महेंद्र सोनेवाने, गोन्दिया
तह जिल्हा- गोन्दिया

➖➖➖➖⬛➖➖➖➖➖⬛➖➖➖➖
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट