◾विशेष लेख :- नशिबाचे भोग...


      मी आय.टी.आय.मध्ये मोटार मॅकेनिक या ट्रेडचे प्रशिक्षण घेत होतो. तेव्हा माझ्या सोबत एक मुलगा शिकत होता. त्याचे नाव होते पिंटू . पिंटू हा फार हुशार होता . उंचीने कमी होता . दिसायला छोटासा होता . पण त्याचे ध्येय मात्र मोठे होते . तो सिव्हील ड्राप्समेन चे प्रशिक्षण घेत होता . आम्ही दोघही सालेकस्या वरुन ट्रेन ने गोंदियाला येऊन शासकिय आय.टी.आय. मध्ये शिकत होतो . तसा तो तिरखेडी या गावचा . येण्या जाण्यामध्ये त्याची माझी मैत्री झाली . वयाने सारखेच होतो पण आकाराने तो आमच्यापेक्षा खुप लहान वाटायचा . क्लॉस च्या बाहेर तो नेहमी माझ्या सोबत राहायचा . दोघांचेही वर्ग वेगवेगळे होते पण लंच च्या वेळेत सुध्दा तो आमच्या सोबतच लंच करायचा . दिवस हळू हळू सामोर निघत होते . आणि आम्ही दोघांनीही आय.टी.आय. करुन आपआपल्या वेगळया मार्गाला लागलो होतो . मला डब्ल्यू.सी.एल . चंद्रपूर मध्ये नोकरी मिळाली व तो भंडारा येथे एका खाजगी कार्यालयात ड्राप्समेन म्हणून काम करीत होता . तो भंडारा येथे आपल्या आत्याकडे राहायचा . बारावी सायन्स असल्यामूळे तो आपल्या आत्याच्या लहान मुलांना शिकवित सुध्दा होता . गोडी गंमतीने त्याचेही दिवस निघत होते . तो आपल्या घरचा फार गरीब मुलगा होता . त्याचे बाबा मोलमजूरी करायचे . त्याची आई लहानपणीच वारली असल्यामूळे वडिलांनी दुसरी आई बनवली . ती त्याची सावत्र आई होती . त्याच्याशी तिचा व्यवहार बरोबर नव्हता . तो नेहमी आपल्या घरची , आईची गोष्ट सांगायचा व कधी कधी तर रडायचा सुध्दा . तो खुप भावनिक मुलगा होता . आपल्या आत्याकडे तो मजेत राहत होता . त्याच्या आत्याची मुलगी ही दहावी ला होती . त्यांच्या म्हणण्यावरुन हा तीला गणित समजवून दयायचा . तिचे बाबा हे एस.टी. डेपोमध्ये मॅनेजर होते . राहायला चांगला दोन माळीचा घर होता . सर्व काही व्यवस्थित चालू असतांना ती मुलगी दहावी ला चांगल्या मार्काने पास झाली . पिंटू ची वाहवाही झाली . तीचे एडमिशन पिंटूनेच अकराव्या वर्गात करुन दिलं होतं . पिंटू ला त्याच्या आत्या च्या मुलीचे आकर्षन वाटू लागले . दोन्ही वयात आलेले होते . एक दुसऱ्याला पसंत करीत होते . एक दुसऱ्यासाठी काही भेटी आणून दयायचे . आत्याला ही बरे वाटत होते . पिंटू ने त्या मुलीला सांगितलं की तूझे शिक्षण पूर्ण झाले की आपण लग्न करायचे . तिलाही ते मान्य होते . सायंकाळी दोन्ही बाजारात जाऊन सामान आणायचे . कधी गार्डनमध्ये फिरायला जात होते . काहीही काम असले तरी आत्या पिंटूला सांगायची . तो आपल्या पूर्ण जबाबदारीने काम करायचा . एकदा मी भंडायला गेलो तेव्हा त्याने मला आपल्या आत्याच्या घरी घेऊन गेला . आपल्या आत्या ची व त्या मूलीची भेट त्याने करुन दिली . मला ते फार प्रेमळ वाटले . चहा नास्ता करुन मी त्यांच्या घरुन आलो . क्रतू बदलतात तसे दिवस बदलत गेले , ती मुलगी बारावी चांगल्या गुणांनी पास झाली .
एक दिवस त्यांच्या कडे त्या मुलीचा जन्म दिवस साजरा करण्यासाठी घरचेच लोकं सर्वजन जमले होते . हॅपी बर्थडे साजरा करुन केक कापण्यात आले . हे सर्व आनंदात सुरु असतांना पिंटू ने आपल्या आत्याला म्हटलं की मी एक गोष्ट सर्वाच्या सामोर मी माझ्या मनातली सांगतो . सर्व कान लावून ऐकायला लागले की हा सांगतो तरी काय ? त्याने सर्वासमोर सांगितलं की मी ( त्या मुलीचे नाव घेऊन ) तीला पसंत करतो व ती ही मला पसंत करते व आम्ही लग्न करायला तयार आहोत आपण आम्हाला परवानगी दयावी . एवढा बोलल्या नंतर पूर्ण वातावरण असा स्तब्ध झाला की एखादी त्यांच्यावर विजच कोसळली की काय ? त्यानंतर त्याच्या आत्याने त्याच्या कानाखाली दोन थापड लावल्या . आणि त्याला खुप रागावली व म्हणाली की तुझी औकात नाही माझ्या मुलीसोबत लग्न करण्याची . असा विचार करुन तू या घरात राहत होता तर आताच्या आता घरातून निघून जा . पिंटू ला त्याच्या आत्यानं त्याला घराबाहेर काढलं . आणि त्यानंतर त्याच्या डोक्यात एवढा परिणाम झाला की , तो रात्रभर फिरतच राहिला . व त्यानंतर त्याच्या मनावर फारच वाईट परिणाम झाले . तो कितीतरी दिवस रडतच राहिला . मी अशी का चुक केली ? त्याला कळत नव्हते . जिथं त्याला एवढं प्रेम मिळाले तिथंच त्याला एवढी नफरत का ? त्यानं कामावर जानं बंद केलं . विचार करत करत आपल्या घरी सुध्दा गेला नाही . तो नेसल्या कपडयांवरच कुठे कुठे भटकत राहिला . काही दिवसांनी लोक त्याला पागल समजायला लागली होती . तो पूर्णतः आपल्या प्रेमात पागलच झाला होता . पाच सहा वर्षानंतर तो गोंदियाला माझ्या घरी आला तेव्हा त्याला शेजारचे लोक दुर पळवित होते . मी त्याला दुरुनच बघितलं आणि ओळखलं सुध्दा . त्याला घरी घेऊन आलो . त्याचे कपडे फार मळके होते . त्याला बाथरुम मध्ये आंघोळ करायला लावलं . आपले कपडे घालायला दिले . सोबत जेवन करायला लावलं . पण तो व्यवस्थित बोलत नव्हता . त्याला त्याच्या मागचा कारण विचारलं . तेव्हा त्यानं मला आपली सर्व कहानी सांगितली व मलाच प्रश्न केला भाऊ मी प्रेम करुन पागल झालो . माझ्या आत्यानं मला का मारलं ? वारंवार तो हे एकच बोलत राहिला . मी त्याला दोनशे रुपये दिले व आपल्या वडिलांकडे जा म्हणून त्याला बसस्टँड वर सोडून दिले . पुन्हा दोन वर्षानं एकदा त्याचे बाबा मला एका कार्यक्रमात मिळाले . त्यांना मी त्याच्याबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले की तो दोन वर्षाआधि आला होता फक्त एक दिवस घरी राहिला व कुठे गेला आजपर्यत आलाच नाही . आम्ही फार शोधाशोध घेतली . पोलिसात रिपोर्ट घातली पण त्याचा कुठेही पत्ता लागला नाही . अशा प्रकारे एका निर्व्यसनी , हुशार मुलाने आपल्या जीवनाला प्रेमापायी सर्वथा नष्ट केले . याला काय म्हणाल ? 
 
महेन्द्र सोनेवाने गोंदिया  
मो.९ ४२१८०२०६७

➖➖➖➖◾➖➖➖➖◾➖➖➖➖

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

निसर्ग किमया कि देवता ... Mother Nature

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...