◾विशेष लेख :- मृत्यू म्हणजे काय ?
आपल्याला हा जन्म मिळाला आहे .प्रत्येक जन्माचे काही ना काही उद्दिष्ट आहे ,प्रत्येक सजीवाचे काही ना काही महत्त्व आहे, त्याचे काही ना काही कार्य लिखित आहे आणि तो कार्य करण्यास मिळालेला अवकाश म्हणजेच जीवन होय, आणि ह्या जीवनाचा शेवट म्हणजे मृत्यू होय.मित्रांनो आपणाला कोणालाच माहित नाही, मानव जन्म कशासाठी होतो, कुठून जन्म घेतो ,शरीराची प्रक्रिया कशी काम करते .निसर्गाचा वाली कोण निसर्ग कसे काम करते...त्याला कोण नियंत्रणात ठेवते, मृत्यू झाल्यानंतर माणसाची व इतर सजिवांचे काय होते .मृत्यू म्हणजे नेमकं काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो? तसा असतो आज मलाही पडला होता .
- मित्रांनो माणूस पैसे कमवतो ?
- नाव कमवतो ?
- धन दौलत कमवतो आणि सर्व काही येथे ठेवून एका दिवशी मरूनही जातो? .
- जीवन इथेच संपते का ?
- हेच जीवनाचे सत्य आहे का ❓
- मग हे सत्य आहे तर इतर मानव का मानत नाही?
- का काही जणांना पैशाचा लोभ होतो ?
- का काही जणांना असं वाटत नाही की जीवन आपल्याला एक संधी मिळालेले आहे ,ते भरभरून जगण्यासाठी का उपयोग करत नाहीत?
विनाकारण भांडत असतात, कुडत असतात, रडत असतात आपल्याला पुढचे जीवन तर माहीत नाही....किमान हे जीवन तरी आनंदी भरभरून जगा त्याचा सदुपयोग करा ते नीट योग्य सांभाळा जगातील सर्वात अनमोल ईश्वराने आपल्याला दिलेली भेट म्हणजे आपले शरीर होय !... त्याची काळजी घ्या .त्यास नियंत्रणात ठेवा त्याच्याकडून योग्य काम करून घ्यावा त्यालाही योग्य मोबदला द्या तुम्हाला एक गोष्ट माहीतच असेल किंवा ऐकली असेलच
ती म्हणजे,
" रेस मधील घोड्याला जर मालक मारत असेल तर त्या मालकाचा उद्देश एकच असतो तो म्हणजे आपल्या घोड्याला रेस मध्ये जिंका वने म्हणून मित्रांनो असेच समजा जर ईश्वर आपल्याला त्रास देत असेल तर तो आपल्याला जाणून बुजून त्रास नाही तर त्याचा उद्देश आपल्याला जीवनाच्या रेसमध्ये जिंकण्याचा आहे "
आणि ही गोष्ट नक्की ध्यानात ठेवा जगातील प्रत्येक पान त्याच्या इच्छेने हालते सर्व काही त्याच्या इच्छेने घडते चोरही त्याच्या इच्छेनेच घडतात, आणि श्रीमंतही त्याच्या इच्छेनेच घडतात सुंदर ही त्याच्या इच्छेनेच घडतात ,आणि करुप ही त्याच्या इच्छेनेच घडतात आणि तुच्छ प्राणी ही त्याच्या इच्छेनेच घडतात आणि उच्च ही त्याच्या इच्छेनेच करतात,
औषधी त्याच्या इच्छेनेच तयार होते, आणि विष ही त्याच्या इच्छेनेच तयार होते...
म्हणून आपण कोणाला जज करू नका. मित्रांनो जगातून प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काहीना काही शिकायला मिळते
- आता हेच बघा अपयशी माणसाकडून कोणत्या चुका करू नयेत हे शिकायला मिळते,
- तर यशस्वी माणसाकडून काय करायला हवे हे शिकायला मिळते
आणि आपला विषय जिथे सुरू झाला होता तो म्हणजे मृत्यू शेवटी आपण कितीही कमावले कितीही भांडले कितीही जिंकलो किती मोठे झालं तर ते आपल्या शेवटी येणार नाही आणि हा जन्म पुन्हा नाही त्याचा सदुपयोग करा याचा वापर करा बाकी आपण आपले जीवन कसे जगायला आहे हे आपण सर्वच आपल्या फायद्याचे जाणता
लेखक - Arjun Apparao Jadhav
याच विषयावर माझी कविता व्हिडिओ रुपी पाहण्यासाठी किंवा वाचण्यासाठी खालील लिंक देत आहे
- 🎥 video >> कविता पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- 📖 read >> कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा
➖➖➖➖➖⬛➖➖➖➖⬛➖➖➖➖➖
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा