◾विशेष लेख :- मैत्री एक सुखद अनुभव...

*मैत्री एक सुखद अनुभव*

       *मैत्रीला वयाचे बंधन नसते. मैत्री कोणाबरोबरही होऊ शकते. मैत्रीमध्ये स्त्री-पुरुष हा भेदभाव नसतो. मैत्रीमध्ये आपण काय काम करतो हे कधीही विचारात घेतले जात नाही, मैत्रीमध्ये हे तुझं हे माझं असं काहीही.नसतं जे काही असतं ते आपलं दोघांचं असतं. मैत्रीची ताकद खूप मोठी आहे. मैत्रीही  स्वच्छ, पारदर्शक असते. मैत्रीला भाषेचे बंधन नसते. मैत्रीची व्याख्या ही खूप व्यापक आहे.*
     
         *मैत्री या पवित्र नात्यातला सर्वात मूलभूत नियम म्हणजे यात पारदर्शकता हवीच.अशी पारदर्शकता ज्या नात्यात ठेवायला जमते तेथे मैत्रीचे नाते आकार घेते,विकसित होते,  फुलते.जीवाभावाचा मित्र तोच असू शकतो जो काहीही ऐकू शकतो व कितीही विचारू शकतो. डोळ्यात डोळे घालुन मित्रांच्या तोंडावर सत्य सांगण्याचं धाडस हे खऱ्या मैत्रीचे  मोठं वैशिष्ट्य असतं. पद, गरिमा ऐश्वर्य, बुद्धिमत्ता, सामर्थ्य इत्यादी गोष्टी या खऱ्या मैत्रीसमोर अगदीच गौण किंवा दुर्लक्षणीय ठरतात.*

       *मैत्री ही फक्त मैत्री असते. भाग्य, नियती, उपकार, ऋण इत्यादी शब्दांच स्मरणही मैत्रीत  दोहो बाजूंनी होता कामा नये. मैत्री अतूट,अथांग आणि नेहमीच आनंद देणारी असते.*

      *मैत्रीचे धागे हे खूप मजबूत असतात. मित्र आपणाला पूर्णपणे समजून घेऊ शकतात.काही गोष्टी आपण आई वडिलांसमोर बोलू शकत नाही त्या आपण आपल्या मित्रांसमोर अगदी निसंकोचपणे  व काहीही न लपविता, बिनधास्त बोलू शकतो.आपल्या मनातील भावना, विचार आपण आपल्या मित्रांसमोर अगदी निसंकोचपणे  सांगू शकतो.आयुष्यातील एखाद्या कठीण प्रसंगी आपण आपल्या मित्राला सल्ला विचारला तर तो आपल्याला नक्कीच योग्य तो सल्ला किंवा मार्गदर्शन देतो. ज्यामुळे आपल्याला त्या संकटातून किंवा कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यास नक्कीच मदत होते. एखाद्या कठीण  प्रसंगी आपले नातेवाईक आपल्याला मदत करणार नाहीत पण त्या प्रसंगी  आपले मित्र नक्कीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे  राहतात हीच मैत्रीची खरी ताकत आहे.*

        *केवळ स्वतःच्या पलीकडे विचार करण्याची क्षमता मनाला मैत्रीच्या नात्याकडे घेऊन जाते. मैत्रीमध्ये दोन्ही बाजूने केवळ स्वीकार आहे.भौतिक समृद्धतेचा निकषांवर मैत्री आधारलेली नाही.*
    
    *मैत्री ही अशी गोष्ट आहे की जी ठरवून करता येत नाही. काही  प्रसंगी प्रथम भेटीतच आपण एकमेकांचे चांगले मित्र  बनून जातो. काही व्यक्ती काही क्षणातच मनाला खूप आवडतात.  व त्यांच्याबरोबर आपला मैत्रीचा प्रवास तेथूनच चालू होतो.*

        *सच्चा मैत्रीत मिंधेपणा येता कामा नये. मदत करणाऱ्या मित्राने ही विशेष काळजी घ्यायला हवी. जिथे मदतीचं ओझं  किंवा मिंधेपणा येतो तेथे बरोबरीची मैत्री शिल्लक राहत नाही. राहत होतो फक्त  मैत्रीचा एक उपचार.*

       *खऱ्या मैत्रीमध्ये हे जरुरी नाही की आपण नेहमी किंवा वारंवार एकमेकांना भेटलोच पाहिजे किंवा त्यांच्याशी आपले नित्यनियमाने भ्रमणध्वनीवरून संभाषण होणे गरजेचे आहे असे बिलकुल नाही. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात व आपल्या कौटुंबिक गरजा वाढल्यामुळे कितीही मनात आणले तरी आपण वारंवार मित्रांना वैयक्तिकरित्या भेटू शकत  नाही. काही मित्र हे नोकरीमुळे ,   आपल्या चरितार्थासाठी आपल्या गावापासून खूप लांब दुसऱ्या शहरांमध्ये किंवा परदेशामध्ये स्थायिक  झालेले असतात, त्यामुळे त्यांच्याशी वैयक्तिकरित्या भेटणे खूप अवघड असते.परंतु त्यामुळे त्यांच्या मैत्रीमध्ये कुठेही अडथळा येत नाही. मैत्रीमध्ये दोघांचे स्वभाव किंवा मने जुळतात त्त्यामुळे ते एकमेकांपासून किती दूर आहेत याला बिलकुल महत्व नसते. मैत्रीची ही एक वेगळीच ताकत आहे असे माझे मत आहे.*

         *आपण मैत्री हे नातं असतं वगैरे शब्दप्रयोग करतो पण तो चुकीचा आहे. मुळात नात हा मैत्रीचा एक भाग आहे. मैत्री हा सगळ्या प्रकारची नाती फक्त टिकवून ठेवणारा अतूट धागा असतो. मैत्रित नातं असो नसो पण नात्यात  मात्र मैत्री हा घटक असला तरच हे नातं फुलत,दृढ होतं, पारदर्शी होतं. मैत्रीतूनच      नात्यांचे विविध पदर खुलतात. कृष्णाची सुदामा बरोबर, कृष्णाची अर्जुनाशी, कृष्णाची द्रौपदीशी, कृष्णाची राधेशी, कृष्णाची मीरा बरोबर असलेली मैत्री अलौकिक आहे..मैत्री आग्रही नको, मागणी करणारी नको, खुलासे करायला भाग पाडणारी नको. खरी मैत्री वारंवार भेटीचा, वारंवार व्यक्त होत राहण्याचा दुराग्रह करत नाही. खरी मैत्री ही दोन वाक्यांच्या मधील अंतर भरून काढणारी असते. लाऊड नसलेली न बोलता न भेटताही दोघांतील अवकाश भरून काढणारी असते.*

            *मित्र हे दोन प्रकारचे असावेत असे माझे वैयक्तिक मत आहे.पहिल्या प्रकारचा मित्र जो श्रीकृष्णासारखा तुमची बाजू बरोबर किंवा सत्याची आहे म्हणून  कायम तुमच्या बाजूने उभा राहतो. दुसऱ्या प्रकारचा मित्रहा कर्णसारखा असतो. त्याला माहित असते की आपल्या  मित्राचे वर्तन चुकीचे आहे किंवा तो जे काही कृत्य करीत आहे ते धर्माच्या विरुद्ध आहे. हे सर्व माहीत असताना सुद्धा तो त्या मित्राच्या बरोबर त्याच्या प्रत्येक प्रसंगी ठामपणे उभा राहतो.  कारण त्याने त्याला त्याच्या वाईट प्रसंगात मदत केलेली असते   किंवा त्याला सांभाळून घेतलेले असते. त्यामुळे त्या मित्राच्या कुठल्याही चांगल्या किंवा वाईट प्रसंगी त्याची मदत करणे हा मैत्री धर्म आहे असे तो मानतो. ही सुद्धा मैत्रीची एक वेगळ्याच प्रकारची ताकद आहे असे माझे अत्यंत प्रांजळ मत आहे. माझ्या या मताशी सर्वजण सहमत होतील असे मला वाटत नाही.*

            *पती-पत्नी हे लग्नानंतर काही वर्षांनी जेव्हा एकमेकांचे चांगले मित्र बनतात तेव्हा त्यांचा सहजीवनाचा प्रवास हा खूपच सुखकारक, आनंददायी होतो असे माझे मत आहे.दोघेही  एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात व त्यांचे आपापसातील नाते हे अधिकच दृढ,मजबूत, सुंदर होते.*
 
          *लग्नानंतरही एखाद्या पुरुषाला मैत्रीण व महिलेला मित्र असावा असे माझे स्पष्ट मत आहे.*
*अशा प्रकारच्या मैत्रीमध्ये एक प्रकारची सूक्ष्म लक्ष्मण रेषा असते त्याचे दोघांकडूनही जर पालन झाले तर अशा प्रकारची मैत्रीही निर्मळ,पवित्र,पारदर्शक होईल याची मला खात्री आहे*

       *आपण आपली मुले जेव्हा  वयाने मोठी होतात तेव्हा त्यांच्याशी एक पालक म्हणून मैत्रीचे नाते ठेवले पाहिजे* *असे माझे वैयक्तिक मत आहे..आपण जर आपल्या मुलांचे मित्र बनलो तर तर आपली मुले ही आपल्याशी खुप मोकळेपणाने,   मनात काहीही न* *ठेवता निसंकोचपणे बोलतील. त्यामुळे मुलांच्या मनात नक्की काय चालू आहे हे आपणाला कळून येईल व त्याप्रमाणे आपण त्यांना योग्य*
*योग्य मार्ग दाखवू शकू, मार्गदर्शन देऊ शकू, सल्ला देऊ शकू असे मला वाटते. त्यामुळे आपले पाल्याबरोबरचे संबंध किंवा नाते अधिकच घट्ट होण्यास मदत होईल.*
   
           *हेवेदावे अन आपपरभाव   यासारख्या छोट्याशा गोष्टी पल्याड जाऊन अफाट  मनोविश्वाचा पदर उलगडण्याची क्षमता केवळ मैत्रीच्या नात्यात आहे. मैत्रीच्या नात्यात एकमेकांविषयी जसा आदर दडला आहे, तसा   एकमेकांकरिता त्यागही दडला आहे. महाभारतातील श्रीकृष्ण व सुदाम्याच उदाहरण मैत्री म्हणजे काय हे सांगण्यासाठी आदर्श  आहे.*

        *मैत्री फक्त दोन व्यक्तींमधील नसते.ती निसर्गाबरोबर,  पावसाशी, पक्षांसोबत, गावाशी शहराशी असू शकते. ज्या ज्या ठिकाणी आपण बोलता न बोलता व्यक्त होऊ शकतो ते ते आपले मैत्र.*

       *नात्यांचे विविध पैलू मानवी जीवनात असतात. रक्ताची नाती तर जन्मापासून हयातभर सोबत करतात. मात्र कुठलाही व्यक्ती  मैत्रीच्या निर्मळ साथीशिवाय राहू शकत नाही. मानवी जीवनाच्या दीर्घ वाटचालीत आव्हाने, वाईट काळात व आनंदाच्या प्रसंगीही मैत्रीचे नातं हे मन हलक करायला खूप गरजेचे आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.*

*लेखक : आनंद रुद्रप्पा हूलगेरी*

*1,पर्ल रेसिडन्स,* *मिरानगर,जुळे सोलापूर,सोलापूर.*
*पिन* *--413008*  *भ्रमणध्वनी ---*
*9175087388* *8208306246


➖➖➖➖◾➖➖➖➖◾➖➖➖➖

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

निसर्ग किमया कि देवता ... Mother Nature

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...