◾कविता :- वसंत ऋतू...
आला वसंत ऋतू हा ,
गातो हासतो नाचत ।
जादू करतो मनाला ,
चराचर फुलवित ॥
रंग भरीत वसंत ,
पहा येतसे जगती ।
उपवन बहरुन ,
गीत कोकीळा ही गाती ॥
दहा दिशा बहरुन ,
येतो राजा हा ऋतूचा ।
आधि सुगंधाचे रुप ,
येतो मोहर आंब्याचा ॥
येता घेऊन पळस ,
रंग केशरी उडतो ।
दिमाखात डौलदार ,
आम्रतरु मोहरतो ॥
दिसे गुलमोहर हा ,
लाल फुलांनी सजला ।
येता चाहुल वसंत ,
वसंत आल्याचे वदला ॥
फुल अंगणी फुलले , '
शुभ्र सुगंधी मोगरा ।
खेळी पवन आकाशी ,
सारा हिरवा दुलारा ।।
दूर आळस सारुन ,
सारी सृष्टी बागडते ।
ऋतू वसंत झुमत ,
आम्हा सर्व आवडते ॥
ग्रीष्म हा तापू लागला ,
ऊन कडक तिडके ।
खुप तापली जमीन ,
जागोजागी पडे तडे ||
=======================
*महेन्द्र सोनेवाने , “ यशोमन "*
*गोंदिया*
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा