◾कविता : सावित्री ती...सावित्री ही... | ✍संतराम पाटील
कविता : सावित्री ती ....सावित्री ही. ... दुर्गा ,महिशासुर ,मर्दिनी ,रणचंडीका ,अंबा , या नऊ अवतारी रंगून, अनवाणी फिरत , नऊदिवस ,नऊराती ,ऊपाशी रहावुन दगड आणि दगडाच्या मुर्ती पुजत राहीली ही .... हीच्यासाठी ... दगड गोट्याचे, शेणामातीचे घाव शोषित राहिली ती...!!1!! वडाच्या झाडाला फेर्या मारत , देव देवताच्या आरत्या पाठ करून,संतोषी माता ,लक्ष्मी व्रताच्या कथा तोंड पाठ करून, स्व :ताची जन्म तारीख सुद्धा विसरून ,सत्यनारायणाची पुजा घालुन ऐकत बसते ही ..... हातात खडु घेऊन... स्वःता शिकुन भिडे वाड्यात.. ही ... ला शिकवण्या साठी लढत राहीली ती..!2!! शिकुन सवरून शहाणी होऊन,बुवा बाजी, अंगारा, धुपारा, कर्म कांड ,गंडे दोरे बांधून बोलती नवस, मारती मंदिरा भोवतीन फेरे ,सबला आसुनही, बनुन आबला ,हातात पारतंत्र्याच्या बेड्या ,सन्माननीय घालते ही ..... स्त्रियांचे शिक्षण आणि स्वातंत्र्य,समानता भेदभावा विरुद्ध संघर्षाची बिजे पेरती ...ती पेटती मशाल...जोतिबाची सावित्री..प्रस्थापित व्यवस्थेची शिकार बनलेली ...आजची सावित्री ही ......!!3!! अजून एक आहे ती ...वारसा चालवते सावित्रीचा ,लढते पुरूषी अंहकारा विरूध्द,ज