माणुसकी ... Manuski | New Marathi Poem | संतराम नाना पाटिल
कविता : माणूसकी
बोल माणसा खडे बोल
मी बोलतोय मनी
एक काळ आसा होता
मला विचारत नव्हतं कुणी ...
मोल होत वस्तुला
देवान घेवानही वस्तुची
जगण्यासाठी त्या काळी
नव्हती गरज पैशाची ....
सोनं चांदी विकायची
आणा गीनी रूपायात
काठीला सोने बांधून
लोक फिरायचे गावात...
गावालाही गावपण होते
चावडीत लोक बसायचे
सर्व मान्य तोडगा काढून
न्याय निवाडा करायचे ....
सारे गाव सरपंच पाटील
नाममात्र एकजण
अन्याय नसे कोणावरच
जोडले जायचे सगळेजन ....
निवडणूक नसली तरी
गावगाडा एकाने हाकायचा
क्षणिक सुखासाठी कोण
गावच नाही विकायचा....
परस्परांच्या प्रेमावरती
ठरायची तेंव्हा माणुसकी
नाती गोती जपायची
म्हणजे वाढायची लायकी ....
सोने चांदी पैसा नव्हता
रूबाब होता माणसात
बहीण भावात प्रेम होते
एकत्र यायचे उरसात...
रोटीबेटीचे व्यवहार सुद्धा
पै पाहुण्यात व्हायचे
पाव्हणा असला गरीब
तरी हातात हात द्यायचे...
गेले दिवस सरल्या आठवणी
विश्वासाचा होता खेळ
वाढत चाललाय अविश्वास
कुणाचा कुणाला नाही मेळ....
हे आसे का ? होतेय
दुनिया चाललीय पैशावर
पुसली गेलीत नाती सारी
पैसा म्हणजे परमेश्वर....
खिशात आणा तो शहाणा
पैसा नाही विचारतो कोण
पैसै मिळतील व्याजाने
मिळेल का माणूसकीचे लोण....
कवी : संतराम नाना पाटिल
मो नं.9096769554
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
आज शाओमी ने अपना Xiaomi CIVI 4 Pro लॉन्च किया है। इस फोन को चीन में प्रदर्शित किया जा रहा है। कम्पनी ने अपनी चीनी वेबसाइट पर फोन को सूचीबद्ध किया है। कम्पनी ने इस फोन को तीन सुंदर कलर विकल्पों में पेश किया है। Snapdragon 8s Gen 3 वाला नवीनतम फोन सामने आया है।
उत्तर द्याहटवा