◾कविता :- तौके चक्री वादळा
खवळला समिंदर , उसळत आहेत लाटा
उंच उंच लाटा देती ,पर्वता सम ललाटा
किती अक्राळविक्राळ ,स्वरूप पहायचे
तु फिरत आहेस ,चक्री आणि सोसाटा
हदरून सोडलास ,जमीन असमंत सारा
तौके चक्री वादळा ,निर्णय हा करंटा .....
किती होतोस क्रूर ,सोडलीस तु सिमा
पाडलीस घरे दारे ,जीव केलास निम्मा
उन्मळून पडले वृक्ष सारे ,पहाडा समान
भुमातेने सोडली जागा ,झाला तु बेभान
तुच वारा कधी होतोस, या जिवांचा अधार
खवळलास जर का तु ,फिरवतोस वरवंटा....
होत नव्हतं सगळं तु, आता संपवलास
पाऊस पाणी वादळात ,माणूस हरवलास
कोपु नग आता माणसावर ,नको करू राग
हरला आता माणूस ,त्यासी संथ होऊन वाग
होय निसर्गासी ,माणसाने केलाय खेळ
म्हणून तु माणसावर ,आणलीस हि वेळ
भरवसा नाही राहिला, नको होऊ उलटा...
वार्या शिवाय चालत नाही,अशी हि सृष्टी
तुझ्या कोपाने मानवाला ,मिळेल नवी दृष्टी
आता नकोच परत ,दाखवु विक्राळ रूप
आता आमची जीवाची, हानी झाली खुप
चक्री वादळी रूप ,आता जरा थांबव
निसर्गातील सर्व जीवाना, तुच आता जगव
निसर्गातील तु सगळा ,भरून काढलास कोटा ...
खवळलेल्या सागराच्या थोपव तु लाटा ...
रचना
संतराम पाटील
केनवडे ता.कागल जि .कोल्हापूर
मो.नं 9096769554
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा